घाटकोपर रेल्वे स्थानकात तांत्रिक बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा खोळंबली आहे.
मुंबई- मध्य रेल्वेच्या शनारी पुन्हा एकदा खोळंबा झाल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. घाटकोपर रेल्वे स्थानकात तांत्रिक बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा खोळंबली आहे.
या तांत्रिक बिघाडामुळे घाटकोपर रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक १ आणि २ वरील वाहतूक बंद असून येथील वाहतूक प्लॅटफॉर्म क्रमांक ३ आणि ४ वर वळण्यात आली आहे.
तांत्रिक बिघाड झाल्याने शनिवारी पुन्हा ऐन गर्दीच्यावेळेस मध्य रेल्वेचा खोळंबा झाल्याने प्रवासी प्रचंड संतापले आहेत.
शुक्रवारी मानखूर्द-चेंबूर रेल्वे स्थानकांदरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने हार्बर रेल्वे विस्कळीत झाली होती. पाठोपाठ मध्य रेल्वे मार्गावर घाटकोपरहून ठाण्याकडे जाणारी वाहतूक ठप्प होती. हार्बर मार्गावर गाडया १५ ते २० मिनिटे उशिराने धावत होत्या.
प्रवाशांच्या कामावरुन घरी परतण्याच्यावेळी हा बिघाड झाल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. मानखूर्द-चेंबूर दरम्यान बिघाड झाल्याने लोकल खोळंबल्या होत्या. रोजरोज होणा-या या घटनांमुळे प्रवासी प्रचंड संतापले आहेत.