मराठी नवकवितेचे जनक कृष्णाजी केशव दामले यांचे बंधू व प्रसिद्ध व्याकरणकार मोरो केशव दामले यांचा आज स्मृतिदिन.
दि. ७ नोव्हेंबर १८६८ रोजी त्यांचा जन्म झाला. पूर्वकालीन व्याकरणकारांच्या मतांचे चिकित्सकपणे समीक्षण करून मराठी व्याकरणाच्या पुनर्रचनेसाठी केलेल्या अथक प्रयत्नांमुळे मोरो केशव दामले यांना मराठी व्याकरणाच्या क्षेत्रात मानाचे स्थान लाभले आहे.
‘शुद्धलेखन सुधारण अथवा सरकारी बंडावा’, शास्त्रीय मराठी व्याकरण हे त्यांचे ग्रंथ विशेष गाजले. ‘ग्रंथमाला’ या मासिकातून त्यांनी लिहिलेल्या लेखांचे ‘विचारभ्रमण’ व ‘आधुनिक असंतोष’ हे ग्रंथ प्रसिद्ध झाले. व्याकरणकार मोरो केशवांनी तर्कशास्त्रावरही ‘न्यायशास्त्रे’ या ग्रंथाचे दोन भागांत लेखन केले. मराठीतील या आद्य व्याकरणकाराचा आज स्मृतिदिन. दि. ३० एप्रिल १९१३ रोजी त्यांचे निधन झाले.