भाजपचे नेते नरेंद्र मोदी बुधवारी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार आहेत.
अहमदाबाद– भाजपचे नेते नरेंद्र मोदी बुधवारी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार आहेत. तब्बल १२ वर्षाहून अधिक काळा मुख्यमंत्रीपदावर असणा-या मोदींची मंगळवारी भाजप आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीने लोकसभेच्या नेतेपदी निवड केली. त्यानंतर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी मोदींची पंतप्रधानपदी नेमणूक केली.
नरेंद्र मोदींची पंतप्रधापदी नेमणूक, शपथविधी २६ मे रोजी »
मोदींनी सात ऑक्टोबर २००१मध्ये गुजरातचे मुख्यमंत्रीपद स्वीकारले होते. मुख्यमंत्रीपदाबरोबरच मोदी विधानसभा सदस्यत्वाचा देखील राजीनामा देतील. गुजरातचे राज्यपाल कमला बेनीवाल यांच्याकडे राजीनामा देण्यापूर्वी मोदी गुजरात विधानसभेच्या विशेष अधिवेशनात सभागृहात भाषण करणार आहेत. बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास मोदी राजीनामा देतील असे भाजपचे प्रवक्ते हरसाद पटेल यांनी सांगितले.
मोदींच्या राजीनाम्यानंतर भाजपचे विधिमंडळातील सदस्य आपल्या नव्या नेत्याची निवड करतील. नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधानपदासाठीचा शपथविधी २६ मे रोजी राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात संध्याकाळी सहा वाजता होणार आहे.