पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ करुन, सर्वसामान्यांना मोदी सरकारने महागाईचा डबल दणका दिला आहे.
नवी दिल्ली – महागाई कमी करण्याचे दावे करुन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी महागाईमध्ये भर घालणारा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर शनिवारीच पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ करुन, सर्वसामान्यांना मोदी सरकारने महागाईचा डबल दणका दिला आहे.
प्रतिलीटर पेट्रोल तीन रुपये १८ पैशांनी तर, प्रतिलीटर डिझेल तीन रुपये ९ पैशांनी महागले आहे. आधीच १२ टक्के असणारा सेवाकर १४ टक्के करुन महागाईला खतपाणी घातल्यानंतर आता प्रतिलीटर डिझेलच्या दरात वाढ झाल्याने सर्वसामान्य माणूस महागाईमध्ये होरपळणार आहे.
भाजीपाला, जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती डिझेलवर अवलंबून असतात. आता डिझेलच्या किंमती भडकल्याने दैनंदिन वापराच्या वस्तू महागणार आहेत.