आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आलेल्या भाजप नेते नरेंद्र मोदी यांनी निवडणूक आयोगाची माफी मागावी, असे केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी म्हटले आहे.
नवी दिल्ली – आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आलेल्या भाजप नेते नरेंद्र मोदी यांनी निवडणूक आयोगाची माफी मागावी, असे केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी म्हटले आहे.
तुम्ही एखादी चुकीची गोष्ट करताना पकडले गेलात तर प्रामाणिकपणे माफी मागावी, असे चिदंबरम यांनी गुरुवारी अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या मुख्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
गुजरातच्या स्थानिक प्रशासनाने मोदींविरोधात दाखल केलेले एफआयआर हा राजकीय कट असल्याचा मोदींचा आरोप त्यांनी फेटाळून लावला. भाजपने काँग्रेससह इतर पक्षांविरोधात अनेक तक्रारी केल्या आहेत. मग तो त्यांचा राजकीय कट होता का, असा सवालही त्यांनी केला. भाजपचे चुकीचे पाऊल पडल्यानंतर त्यांना अशी राजकीय वक्तव्ये करावी लागत असल्याचे चिदंबरम यांनी सांगितले.