मतदानादिवशी मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करणारे भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या विरोधात निवडणूक आयोगाने कारवाई करावी अशी मागणी काँग्रेसने केली आहे.
नवी दिल्ली- मतदानादिवशी मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करणारे भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या विरोधात निवडणूक आयोगाने कारवाई करावी अशी मागणी काँग्रेसने केली आहे.
लोकसभा निडणुकीच्या अखेरच्या टप्प्यातील मतदानाला सोमवारी सकाळी सुरुवात झाली आहे. या टप्प्यात मोदी निवडणूक लढवत असलेल्या वाराणसी लोकसभा मतदारसंघाचा देखील समावेश होतो. मोदींनी वाराणसीमधील मतदरांना मतदान करावे असे आवाहन करणारा व्हिडिओ प्रसिद्ध केला.
त्यानंतर अनेक वृत्तवाहिन्यांवर हा व्हिडिओ दाखवण्यात आला. यावर निवडणूक आयोगाने कारवाई करावी. मोदींनी आचारसहिंतेचा भंग केल्याचे काँग्रेसचे नेते अजय माकन यांनी म्हटले आहे.