पाकिस्तानच्या राष्ट्रीय दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानबाबत घेतलेली सहकार्याची भूमिका खुद्द मोदींच्या सहकारी मंत्र्यांना पटलेली नाही.
नवी दिल्ली – पाकिस्तानच्या राष्ट्रीय दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानबाबत घेतलेली सहकार्याची भूमिका खुद्द मोदींच्या सहकारी मंत्र्यांना पटलेली नाही.
माजी लष्करप्रमुख आणि विद्यमान परराष्ट्र राज्यमंत्री व्ही.के.सिंह यांच्या टि्वटसवरुन ही बाब समोर आली आहे. नवी दिल्लीत पाकिस्तानी उच्चायुक्तांनी राष्ट्रीय दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या भोजन समारंभाला व्ही.के.सिंह केंद्र सरकारचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते.
या कार्यक्रमावरुन परतल्यानंतर सिंह यांनी केवळ कर्तव्य म्हणून आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याचे टि्वट केले. नैतिक आणि कायदेशीर कारणांमुळे अनेकदा व्यक्तीला जबाबदारी निभवावी लागते असे टि्वट सिंह यांनी केले आहेत.
सिंह यांच्या या टि्वटसवरुन पर्याय नसल्याने नाखुशीने ते उपस्थित राहिल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे मोदींच्या निर्णयाला मनापासून त्यांच्या मंत्र्यांची साथ नव्हती. या कार्यक्रमाला पाकिस्तानने काश्मीरच्या फुटीरतावाद्यांना निमंत्रण देऊन भारताला डिवचले.
खरतर मोदी सरकारने यासाठी पाकिस्तानला जाब विचारायला हवा होता. मात्र उलट नरेंद्र मोदींनी पाकिस्तानी पंतप्रधान नवाझ शरीफ यांना राष्ट्रीय दिनाचा शुभेच्छा संदेश पाठवला. त्यामुळे पाकिस्तानच्या राष्ट्रीय दिनाच्या निमित्ताने मोदी सरकारमधील अंतर्गत विरोधाभास समोर आला आहे.