नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाले आणि त्यांचे मंत्रिमंडळही यथास्थित निश्चित झाले. मंत्रिमंडळाच्या घोषणेनंतर सर्वाधिक चर्चा सुरू आहे ती अरुण जेटली यांच्या नावाची. मुळात भारतीय जनता पक्षाला लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळालेले असले, तरी त्यांचे राज्यसभेतील ज्येष्ठ नेते अरुण जेटली हे निवडणूक हरलेल्या मोजक्याच नेत्यांपैकी एक आहेत. तरीदेखील त्यांच्याकडे अर्थ आणि संरक्षण अशी दोन महत्त्वाची खाती आल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. परंतु जेटली आणि मोदी यांच्यातील संबंध ठाऊक असणा-यांना या निर्णयाचे फारसे आश्चर्य वाटले नाही. मतमोजणीच्या दोन दिवस आधी भाजपचे राज्यातील नेते नितीन गडकरी यांनी गांधीनगरमध्ये मोदी यांची भेट घेतली होती. या बैठकीला भाजपचे मावळते अध्यक्ष आणि विद्यमान गृहमंत्री राजनाथ सिंह, तसेच अरुण जेटली उपस्थित होते. यावेळी केवळ जेटली बोलत होते आणि बाकीचे ऐकत होते. जेटली यांचे मोदींच्या जवळच्या वर्तुळात असलेले महत्त्व यावरून लक्षात येते. यंदाच्या निवडणुकीच्या वेळी उमेदवारी अर्ज भरताना आपली ओळख ‘विवाहित’ अशी दाखवण्याचा सल्ला मोदींना जेटलींनीच दिला. एक निष्णात वकील म्हणून जेटली यांची ख्याती आहे. ते व्ही. पी. सिंह यांच्या कार्यकालात अतिरिक्त सॉलिसिटर जनरल होते. अनेक राजकीय नेते आणि बडया कॉर्पोरेट कंपन्यांचे वकील म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. इंग्रजी आणि हिंदी भाषेवरील प्रभुत्वाच्या जोरावर राज्यसभा, वृत्तवाहिन्या आणि इतर व्यासपीठांवर त्यांनी वेळोवेळी स्वत:ची वेगळी छाप उमटवलेली आहे. अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये त्यांनी वाणिज्य, उद्योग, कायदा व सुव्यवस्था अशी महत्त्वाची खाती हाताळली होती. यंदा त्यांच्याकडे अर्थ आणि संरक्षण अशी दोन महत्त्वाची खाती सोपवण्यात आली असली, तरी भविष्यात अर्थ खात्यावरच त्यांना लक्ष केंद्रित करावे लागेल, असे दिसते. आर्थिक प्रश्नांची त्यांची जाण सर्वपरिचित आहे. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्याशी त्यांनी आर्थिक प्रश्नांवर घातलेले वाद गाजले. पदभार स्वीकारल्यानंतर दुस-याच दिवशी त्यांनी रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांची भेट घेतली आणि त्यांच्यावर विश्वास दाखवला. भाववाढ, विकासदर, आर्थिक तूट अशी अनेक आव्हाने सध्या भारतीय अर्थव्यवस्थेसमोर उभी आहेत. मोदी सरकारकडून असलेल्या अपेक्षा प्रामुख्याने आर्थिक प्रश्नांशी निगडित असल्यामुळे जेटली यांची कसोटी लागणार हे नक्की.
Recent Comments
किल्ले जीवधन
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
अभिजात भाषा
on
आळशी मांजर
on
आमचा टॉम
on
छोटीशी सोनू
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
मनातली कविता
on
संपर्क
on
हेल्पलाइन
on
दगडफूल
on
हेल्पलाइन
on
संपर्क
on
संपर्क
on
भयाचे भूत..
on
मोदी करिष्मा
on
E-Book
on
गुणकारी शेपू
on
निष्ठावंत
on
संपर्क
on
संपर्क
on
५१ मध्ये ७
on
गर्दीच गर्दी
on
मूक मोर्चा
on
RSS NEWS
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
महात्मा…
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
रामघळ
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
वाढदिवस
on
वृक्षारोपण
on
रमाचा दुखणा
on
तगडे उमेदवार
on
आमची दिवाळी…
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
अनुभव
on
गीर गाय
on
सगुणेचा संप
on
तपास पथक
on
संपर्क
on
भुजंगासन
on
एकटेपणाची सल
on
संपर्क
on
ईश्वर
on
आयपीएल
on
“न्याय द्या”
on
“अभिवादन”
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
संपर्क
on
E-Book
on
हॉटेलचं हृदय
on
फसवणूक
on
भीषण आग..
on
आज टिप ऽऽर!
on
संपर्क
on
संपर्क
on
अमिषा पटेल..
on
संपर्क
on
माझी आई
on
मनातलं
on
वेलकम बॅक
on
संपर्क
on
शटर लाईफ
on
“कुराण वाचन”
on
चढणीचे मासे
on
संपर्क
on
वैशाख वणवा
on
आजोळचे दिवस
on
संपर्क
on
संपर्क
on
कचरा नकोच!
on
मनातलं
on
मनातलं
on
संपर्क
on
संपर्क
on
जैतापूरच..!
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
तो अन् मी
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
संपर्क
on
संपर्क
on
नूरा कुस्ती
on
“सन्नाटा”
on
खाकीला डाग!
on
सजीव गाथा
on
संपर्क
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
सिगारेट
on
संपर्क
on
सोशल पोलिस
on
गु-हाळ
on
जिंकणारच!
on
आम आदमी सेना
on
ग्रँड चव
on
पाणी
on
पाणी
on
जिंकणारच!
on
जिंकणारच!
on
चमकेशगिरी
on
म्हाळवस
on
सुमंगल यश
on
अर्नोल्ड
on
दहीहंडी
on
भूकंपानंतर…
on
वाघ तो वाघच
on
आदिती राव
on
मुंबई चिंब!
on
वाहतूकवेडा
on
स‘माज’
on
मैं हूँ ना!
on
मेट्रो आली
on
“हीच ती कार”
on
सत्तातूर !
on
विजय सलामी
on
मतदान करा..
on
नाजूक त्वचा
on
जागे व्हा
on
नाच रे मोरा…
on
काठयांचा खेळ
on
“विसर्जन”
on
रेल्वे ठप्प
on
रेल्वे ठप्प
on
भन्नाट
on
“सिंग साहब
on
ऊस पेटला
on
चतुरस्र श्री
on
पेन स्टॅण्ड
on
आनंदाची चाळ
on
चंड‘प्रतापी’
on
महाकुंभ
on
सैतानाचा बाप
on
सुखोई सफर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
बलिष्ठ गवा
on
मराठी बिराठी
on