माध्यमांना प्रेस्टीटय़ूट संबोधत वारांगनेशी तुलना करणा-या परराष्ट्र राज्यमंत्री निवृत्त जनरल व्ही. के. सिंह यांची रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाठराखण केली.
नवी दिल्ली- माध्यमांना प्रेस्टीटय़ूट संबोधत वारांगनेशी तुलना करणा-या परराष्ट्र राज्यमंत्री निवृत्त जनरल व्ही. के. सिंह यांची रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाठराखण केली.
सिंह यांनी मीडियावर टीका केल्यानंतर सातत्याने त्यांच्याविरोधात बातम्या दाखवताना मीडियाने त्यांच्या चांगल्या कामाचीही दखल घ्यायला हवी होती. सरकारच्या चांगल्या गोष्टींची दखल घेतली जात नाही, असे मोदी म्हणाले.
मीडियाने कितीही टीका केली तरी भाजपा मीडियाला गांभीर्याने घेणार नाही, असाच सूर मोदींनी लावला.