जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती महंमद सईद यांची कन्या मेहबुबा मुफ्ती या मुख्यमंत्रीपदावर विराजमान होण्याची शक्यता आहे.
श्रीनगर- जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती महंमद सईद यांची कन्या मेहबुबा मुफ्ती या मुख्यमंत्रीपदावर विराजमान होण्याची शक्यता आहे. मेहबुबा मुफ्ती मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्या तर त्या काश्मीरच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री असतील.
गुरूवारी सकाळी जम्मू-काश्मिरचे मुख्यमंत्री मुफ्ती महंमद सईद यांचे दिल्लीतील एम्स रुग्णालयात आजाराने निधन झाले. त्यामुळे त्यांच्या रिक्त पदावर आता त्यांची कन्या मेहबुबा मुफ्ती यांना हे पद देण्यात येणार असल्याची चर्चा पीडीपीमध्ये सुरू आहे.
मेहबुबा मुफ्ती यांनी मुफ्ती सईद यांच्याबरोबर १९९६मध्ये बीजबेहरा विधासभा मतदार संघातून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरूवात केली. त्या आता ५६ वर्षाच्या असून त्यांना दोन मुली आहेत.
[EPSB]
पीडीपीचे संस्थापक मुफ्ती मोहम्मद सईद यांचे निधन »
जम्मू काश्मिरचे मुख्यमंत्री आणि पीडीपी चे संस्थापक मुफ्ती मोहम्मद सईद यांचं निधन झालं आहे. ते ७९ वर्षाचे होते… [/EPSB]