जेजूत (दक्षिण कोरिया) होणा-या महिलांच्या जागतिक बॉक्सिंग स्पर्धेसाठी दुखापतग्रस्त एम. सी. मेरी कोमच्या जागी पिंकी रानी तसेच एआयबीएची बंदी घातलेल्या सरिता देवीच्या जागी प्रियंका चौधरीची निवड करण्यात आली आहे.
नवी दिल्ली – जेजूत (दक्षिण कोरिया) होणा-या महिलांच्या जागतिक बॉक्सिंग स्पर्धेसाठी दुखापतग्रस्त एम. सी. मेरी कोमच्या जागी पिंकी रानी तसेच एआयबीएची बंदी घातलेल्या सरिता देवीच्या जागी प्रियंका चौधरीची निवड करण्यात आली आहे.
भारताच्या १६ सदस्यीय संघात १० बॉक्सर्सचा समावेश असून पिंकी (५१ किलो) आणि प्रियंकासह (६० किलो) सर्जुबाला देवी (४८ किलो), मीनाकुमारी देवी (५४ किलो), विलाव बसुमतरी (५७ किलो), पवित्रा (६४ किलो), नीतू (६९ किलो), मोनिका सॉन (७५ किलो), स्विटी (८१ किलो) आणि कविताचा (८१ किलोवरील) समावेश आहे. येत्या १३ ते २५ नोव्हेंबरदरम्यान जागतिक स्पर्धा रंगेल.