नर्मादा आंदोलनातील आघाडीच्या नेत्या मेघा पाटकर यांनी आगामी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे.
नवी दिल्ली– नर्मादा आंदोलनातील आघाडीच्या नेत्या मेघा पाटकर यांनी आगामी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र पाटकर कोणत्या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतील हे अद्याप निश्चित करण्यात आलेले नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघातून त्या निवडणूक लढवतील.
मेघा पाटकर यांच्या लोकसभा उमेदवारी संदर्भात बुधवारी आम आदमी पक्षाने पाठिंबा दिला होता. पाटकर जर लोकसभा निवडणूक लढवणार असतील तर त्यांना आप पाठिंबा देईल असे पक्षाने म्हटले होते.