इंग्लिश प्रिमियर लीगमध्ये बुधवारी (१७ एप्रिल) मँचेस्टर युनायटेडची लढत वेस्ट हॅमशी लढत होणार आहे. विक्रमी २०वे जेतेपद पटकवण्यासाठी युनायटेडला आणखी ७ गुणांची गरज आहे.
लंडन – इंग्लिश प्रिमियर लीगमध्ये बुधवारी (१७ एप्रिल) मँचेस्टर युनायटेडची लढत वेस्ट हॅमशी लढत होणार आहे. विक्रमी २०वे जेतेपद पटकवण्यासाठी युनायटेडला आणखी ७ गुणांची गरज आहे. अद्याप सहा सामने बाकी असले तरी वेस्ट हॅमवर विजय मिळवत लवकरात लवकर जेतेपद निश्चित करण्याचा प्रयत्न मँचेस्टर युनायटेड करेल.
मात्र मागील तीन लढतींत वेस्ट हॅमनेही स्पर्धेत पराभव पाहिलेला नाही. उभय संघांमध्ये या हंगामात विविध स्पर्धामध्ये मिळून झालेल्या तीन लढतींत युनायटेडने दोन वेळा विजय मिळवला आहे. वेस्ट हॅमने त्यांना कडवी लढत दिली आहे. मात्र ‘स्टार’ रॉबिन वॅन पर्सीला गवसलेला फॉर्म युनायटेडसाठी जमेची बाजू आहे.
वेळ : मध्यरात्री १२:१५ वा. थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्सवर.
मॅँचेस्टर सिटीसमोर विगॅनचे आव्हान
मॅँचेस्टर : इंग्लिश प्रिमियर लीगमध्ये बुधवारी (१७ एप्रिल) मॅँचेस्टर सिटीची गाठ विगॅनशी पडेल. जेतेपद राखण्याच्या सिटीच्या आशा जवळपास संपुष्टात आल्या असल्या तरी एफए कपच्या अंतिम फेरीपूर्वी फॉर्म राखण्यादृष्टीने विजय विगॅनवर विजय नोंदवण्याचा सिटीचा प्रयत्न असेल.
चेल्सी-फुलहॅम आमनेसामने
लंडन : इंग्लिश प्रिमियर लीगमधील अन्य लढतीत चेल्सी आणि फुलहॅम आमनेसामने आहेत. एफए कप आणि इंग्लिश प्रिमियर लीग जिंकण्याची संधी हुकली असली तरी आता किमान तिसरे स्थान मिळवण्यादृष्टीने फुलहॅमवर विजय मिळवण्याचा चेल्सी करेल. या स्पर्धेत चेल्सीने तीन ‘अवे’ लढती गमावल्या असल्या तरी फुलहॅमविरुद्ध त्यांनी गेल्या १५ लढतींत पराभव पाहिलेला नाही. ते पाहता चेल्सीला फुलहॅमच्या मैदानावर विजयाची संधी आहे.
वेळ : मध्यरात्री १२:१५वा. थेट प्रक्षेपण : ईएसपीएनवर.