सोळाव्या लोकसभा निवडणुकीसाठी मुझ्झफरनगर जिल्ह्यात १३ मे ला फेरमतदान घेण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत.
मुझ्झफरनगर – सोळाव्या लोकसभा निवडणुकीसाठी मुझ्झफरनगर जिल्ह्यात १३ मे ला फेरमतदान घेण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत.
जिल्ह्यातील बेहोलपूर, रसूलपूर जतान आणि नूनाखेरा या मतदान केंद्रावर १३ मे ला फेरमतदान होईल अशी माहिती अतिरिक्त जिल्हा अधीक्षक इंदरमणी त्रिपाठी यांनी दिली.
मतदानादरम्यान या मतदानकेंद्रावर मतदानाच्या प्रक्रियेत अनियमितता दिसून आली होती. तसेच काही मतदान केंद्रावर फेक मतदान झाल्याची तक्रार बसपाचे उमेदवार कादिर राणा आणि काँग्रेसचे उमेदवार पंकज अग्रवाल यांनी निवडणूक आयोगाकडे केली होती. या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाने फेरमतदान घेण्याचे आदेश दिले. १० एप्रिल रोजी या मतदारसंघात मतदान पार पडले होते. यावेळी ७५ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.
अरुणाचलमध्येही फेरमतदान
मुझ्झफरनगरसोबत अरुणाचल प्रदेशमधील दोन मतदान केंद्रावर फेरमतदान घेण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. १४ मे रोजी रिचिक आणि चौला येथे मतदान होणार आहे. पश्चिम अरुणाचल प्रदेश या मतदारसंघातून लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी फेरमतदान होणार आहे असे निवडणूक आयोगाचे अधिकारी चंद्रभूषण कुमार यांनी सांगितले.