मुझ्झफरनगर जिल्ह्यातील सैदापूर गावातील दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीत २५ जण जखमी झाले.
मुझ्झफरनगर – मुझ्झफरनगर जिल्ह्यातील सैदापूर गावातील दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीत २५ जण जखमी झाले. जखमींमध्ये पाच महिलांचाही समावेश आहे.
पैशाच्या कारणावरुन गावातील तन्वीर आणि मेहराज या दोन नागरिकांमध्ये जोरदार भांडण सुरु होते. मात्र हळूहळू हे भांडण विकोपाला गेले आणि दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली. हे रोखण्यासाठी अखेर पोलिसांनी लाठीहल्ला करावा लागल्याची माहिती पोलिस अधिका-यांनी दिली.
दरम्यान, हाणामारीचे वृत्त कळताच तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. गावात सुरक्षेच्या दृष्टीने अधिक पोलिस तैनात करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या हाणामारीतील जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.