१४व्या सीडेड स्पेनच्या गॅर्बिन मुगुरुझाने विम्बल्डन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली. गेल्या तीन वर्षात मुगुरुझाने दुस-यांदा ‘फायनल’ प्रवेश केला.
लंडन – १४व्या सीडेड स्पेनच्या गॅर्बिन मुगुरुझाने विम्बल्डन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली. गेल्या तीन वर्षात मुगुरुझाने दुस-यांदा ‘फायनल’ प्रवेश केला. उपांत्य फेरीत तिने बिनसीडेड स्लोव्हाकियाच्या मॅगडॅलेना रायबरिकोवावर ६-१, ६-१ असा सरळ सेटमध्ये विजय मिळवला. उपांत्य फेरीतील पहिली लढत एकतर्फी ठरली. २४ वर्षीय मुगुरुझाने प्रतिस्पर्धीवर पूर्णपणे वर्चस्व राखले. रायबरिकोवाला प्रत्येकी एक गेम जिंकता आला. यावरून मुगुरुझाच्या झंझावाती खेळाची प्रचिती येते. पाच वेळा तिने प्रतिस्पर्धीची सव्र्हिस भेदली. चौथी स्पर्धा खेळणाऱ्या या स्पेनच्या महिला टेनिसपटूने २०१५मध्ये अंतिम फेरी गाठली होती. मात्र तिला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. गेल्या वर्षी फ्रेंच ओपन जिंकलेल्या मुगुरुझाला कारर्किर्दीतील दुसरे ग्रँडस्लॅम जिंकण्याची संधी आहे.
सानिया मिर्झाचे आव्हान संपुष्टात
मिश्र दुहेरीत भारताच्या रोहन बोपण्णाने कॅनडाच्या गॅब्रिएला डॅब्रोवस्कीसह मिश्र दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. मात्र सानिया मिर्झाचे आव्हान संपुष्टात आले. तिस-या फेरीत दहाव्या सीडेड बोपण्णा-डॅब्रोवस्की जोडीने क्रोएशियाच्या निकोला मेकटिक आणि अॅना काँजू जोडीला ७-६, ६-२ असे हरवले. उपांत्यपूर्व फेरीत त्यांची गाठ गतविजेत्या फिनलंडच्या हेन्री काँटिनेन आणि ब्रिटनच्या हीथर वॉटसनशी पडेल. या जोडीने चौथ्या सीडेड सानिया मिर्झा आणि इव्हान डोडिग (क्रोएशिया) जोडीला ७-६, ६-४ असा बाहेरचा रस्ता दाखवला.
व्हीनस २००९नंतर ‘फायनल’मध्ये
१०वी सीडेड अमेरिकेच्या व्हीनस विल्यम्सने महिला एकेरीत अंतिम फेरीत धडक मारली. उपांत्य फेरीत ब्रिटनच्या योहान्ना कोंटाला ६-४, ६२- असे हरवत तिने ‘फायनल’ प्रवेश केला. पाच वेळची विजेती व्हीनसला २००९ नंतर प्रथमच अंतिम फेरी गाठता आली. १९७७ नंतर विम्बल्डनमध्ये अंतिम फेरी गाठणारी ब्रिटनची पहिली महिला टेनिसपटू बनण्यासाठी उत्सुक असलेल्या कोंटाकडून घरच्या मैदानावर मोठय़ा अपेक्षा होत्या. मात्र ३७ वर्षीय व्हीनससमोर तिचे काहीच चाले नाही. माजी ‘नंबर वन’ व्हीनस विम्बल्डनमध्ये नवव्यांदा अंतिम फेरीत पोहोचली आहे. ‘फायनल’समोर अंतिम फेरीत स्पेनच्या गॅर्बिन मुगुरुझाचे आव्हान आहे.