मुंबई पुणे एक्स्प्रेस महामार्गावर खोपोली येथे दोन ट्रक समोरासमोर आदळून झालेल्या भीषण अपघातात दोन्ही ट्रकचालक जागीच ठार झाले.
![expressway pune mumbai](http://prahaar.in/wp-content/uploads/2013/01/expressway-pune-mumbai.jpg)
खोपोली- मुंबई पुणे एक्स्प्रेस महामार्गावर खोपोली येथे दोन ट्रक समोरासमोर आदळून झालेल्या भीषण अपघातात दोन्ही ट्रकचालक जागीच ठार झाले.
पुण्याहून मुंबईकडे येत असलेल्या ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने तो दुभाजक तोडून मुंबईहून वेगाने येत असलेल्या दुस-या एका ट्रकवर येऊन आदळला. या भीषण अपघातात दोन्ही ट्रक चालकांचा जागीच मृत्यू झाला. मालवाहतूक करणा-या या दोन्ही ट्रकनी रस्ता अडवल्याने या अपघातानंतर मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक खोळंबली आहे.