सोशल मिडीयामध्ये ती विनोदाचा विषय असली तिच्यावरुन विनोद बनत असले तरी, आजच्या घडीला बॉलिवूडमधील ती टॉपची नायिका आहे.
सोशल मिडीयामध्ये ती विनोदाचा विषय असली तिच्यावरुन विनोद बनत असले तरी, आजच्या घडीला बॉलिवूडमधील ती टॉपची नायिका आहे. अवघ्या तीन वर्षात तिने दमदार अभिनयाने प्रेक्षकांना दखल घ्यायला भाग पाडले.
ही ‘ती’ म्हणजे आलिया भट्ट. वयाच्या १९ व्या वर्षी स्टुडंट ऑफ द इयर (२०१२) चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि अवघ्या तीन वर्षात हायवे, २ स्टेटस, हमप्टी शर्मा की दुल्हनिया असे हिट चित्रपट दिले.
बॉलिवूडची तू आजची आघाडीची अभिनेत्री आहेस याचा तुझ्यावर दबाव येतो का ? या प्रश्नावर आलियाने मी स्वत:ला स्टार समजत नाही. मी फक्त चार सिनेमे केले आहेत. स्टार बनण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. माझ्यात ते गुण प्रेक्षकांना दिसतात याचा मला आनंद आहे. मला यश टिकवायचे आहे. सातत्याने चांगल्या कामानंतर स्टारडम मिळते. माझा एखादा चित्रपट खराब निघाला तरी, लोकांची मत बदलू शकतात.