“मी चार्ली आहे, सर्व काही माफ आहे…”असा संदेश देणा-या मोहम्मद पैगंबराचे व्यंगचित्र प्रसिद्ध करुन ‘चार्ली हेब्दो’ या व्यंगचित्रसात्पाहिकाने आपला कणखर बाणा पुन्हा एकदा दाखवला आहे.
पॅरिस– “मी चार्ली आहे, सर्व काही माफ आहे…”असा संदेश देणा-या मोहम्मद पैगंबराचे व्यंगचित्र प्रसिद्ध करुन ‘चार्ली हेब्दो’ या व्यंगचित्रसात्पाहिकाने आपला कणखर बाणा पुन्हा एकदा दाखवला आहे. पॅरिसमधील ‘चार्ली हेब्दो’च्या कार्यालयावर झालेल्या हल्ल्यानंतर प्रसिद्ध झालेल्या या अंक फ्रान्सच्या राजधानीत काही मिनिटांमध्ये विक्री झाली.
‘चार्ली हेब्दो’च्या कार्यालयावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात संपादकासह १२ जण ठार झाले होते. यात नऊ पत्रकारांचा देखील समावेश होता.
अर्थात या अंकात मोहम्मद पैगंबराचे केवळ एकच व्यंगचित्र आहे. मात्र इस्लामी दहशतवाद्यांवर अनेक व्यंगचित्रे छापली आहेत. ‘चार्ली हेब्दो’ची ही आवृत्ती इंग्रजी, स्पॅनिश, इटली, अरबी आणि तुर्की भाषांमध्ये उपलब्ध आहे.
हे अविश्वनिय होते. पहाटे ५.४५ वाजता दुकान सुरु होण्याच्या आधीच जवळ जवळ ६० ते ७० जण अंकासाठी उभे होते आणि माझ्याकडील ४५० अंकांची केवळ १५ मिनिटात विक्री झाल्याचे मेट्रो स्थानकातील विक्रेत्याने सांगितले.