अंमली पदार्थ, इंडियन प्रीमीयर लीगमधील मॅच फिक्सिंग व बेटिंग आदी करणा-या मिर्चीचा मृत्यू दाऊदला झोंबणार आहे.
लंडन– दाऊदचा उजवा हात समजला जाणारा इक्बाल मोहम्मद मेमन ऊर्फ इक्बाल मिर्ची याचा ह्रदयविकाराने मृत्यू झाला आहे. अंमली पदार्थ, इंडियन प्रीमीयर लीगमधील मॅच फिक्सिंग व बेटिंग आदी करणा-या मिर्चीचा मृत्यू दाऊदला झोंबणार आहे. भारताने अनेकवेळा मागणी करूनही मिर्चीचे भारतात हस्तांतरण होऊ शकले नाही. कारण त्याच्या विरोधात भक्कम पुरावे मांडता आले नाही. त्याच्या कुटुंबीयांचा मिर्चीचा व्यवसाय असल्याने त्याला इक्बाल मिर्ची हे नाव पडले.
मिरची व्यापारी ते अंमली पदार्थाचा तस्कर
>कच्छी मेमन कुटुंबात जन्म
>पिढीजात मिरची बनविण्याचा व्यवसाय यामुळे मिर्ची हे टोपण नाव
>अंमली पदार्थाच्या तस्करीतून अफाट संपत्ती
>१९८६ ते ८८ या दोन वर्षात अमली तस्करीचे गुन्हे दाखल
>भारतातून दाऊद बरोबर परदेशात पलायन
>१९९३ रोजी मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी
>१९९४ मध्ये इंटरपोलची ‘रेड कॉर्नर’ नोटिस
>१९९४ मध्ये इंग्लंडमध्ये एका अपघातासंदर्भात इंग्लंड पोलिसांकडून अटक
>१९९५ मध्ये अमर सुवर्णा या विश्वासू साथीदाराच्या हत्येच्या कटात सहभागाचा संशय
>लंडन व दुबई तसेच अमेरिका येथे वास्तव्य
>अमली तस्करीच्या पैशातून ‘रिअल इस्टेट’ मध्ये मोठी गुंतवणूक
>मुंबई वरळी येथे तीन इमारती, माहिम येथे दोन इमारती, जुहु येथे इमारती, तसेच पाचगणी येथे इमारती अशी मालमत्ता यापैकी अनेक मालमत्ता आता सरकारच्या ताब्यात
>२००४ साली अमेरीकेच्या इलिनाईस या शहरात अटक मात्र लगेच सुटका
>ज्येष्ठ पत्रकार जे.डे यांच्या हत्या प्रकरणातही नाव.