काँग्रेसप्रणीत यूपीएकडून राष्ट्रपतीपदासाठी लोकसभेच्या माजी अध्यक्ष मीरा कुमार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
नवी दिल्ली- काँग्रेसप्रणीत यूपीएकडून राष्ट्रपतीपदासाठी मीरा कुमार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मीरा कुमार या काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमधील एक आहेत. त्यांनी बिहार राज्यातून लोकसभेचे प्रतिनिधित्व केले आहे.
काँग्रेसच्या कार्यकाळात मीरा कुमार यांनी लोकसभेचे अध्यक्षपदही भूषवले आहे. लोकसभा अध्यक्ष म्हणून त्यांची ३ जून २००९ रोजी बिनविरोध निवड झाली होती.
मीरा कुमार दलित समाजाचे प्रतिनिधित्व करतात. त्या माजी उपपंतप्रधान जगजीवन राम यांच्या कन्या आहेत. मीरा कुमार या १९९३ मध्ये भारतीय परराष्ट्र सेवेत दाखल झाल्या. त्यांनी अनेक देशांची भ्रमंती केली आहे. त्यांच्या मातोश्री या स्वातंत्र्य सेनानी होत्या.
लोकसभेवर त्या पाच वेळा निवडून गेल्या आहेत. त्या पेशाने एक वकील आणि मुत्सद्दी राजकारणी असून, ८व्या, ११व्या, १२व्या, १४व्या आणि १५व्या लोकसभेवर निवडून गेल्या आहेत. माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या काळात त्यांनी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्रीपदही भूषवले आहे.