इसिस या दहशतवादी संघटनेत सामिल होण्यासाठी गेलेल्या मालवणीतील ‘त्या’ तीन तरुणांचा शोध सुरु असतानाच आता अन्य काही तरुण मालवणीतून गायब असल्याची धक्कादायक माहिती एटीएसच्या तपासात उघडकीस आली आहे.
मुंबई- ‘इसिस’ या अतिरेकी संघटनेत सामील होण्यासाठी गेलेल्या मालवणीतील तीन तरुणांचा शोध सुरू असतानाच आता अन्य काही तरुण मालवणीतून ‘मिसिंग’ असल्याची धक्कादायक माहिती एटीएसच्या तपासात उघडकीस आली आहे.
मालवणीतून अय्याज सुल्तान, मोहसीन शेख आणि वाजिद खान या तिघांसह अन्य काही तरुण बेपत्ता आहेत. संबंधित तरुणही इसिसमध्ये भरती होण्यासाठी घरातून निघून गेल्याचे बोलले जात आहे. ‘मिसिंग’ असलेले संबंधित तरुण एकाच परिसरातील असून या मित्रांचा एक गट आहे.
मिसिंग झालेल्या या तरुणांची नावे आणि इतर तपशील एटीएसला प्राप्त झाला आहे. मात्र त्यांच्याविषयी काहीही माहिती देण्यास पोलीस तयार नाहीत. अशाच प्रकारे अन्य चार ते पाच तरुणांचा एक गट घरातून जाणार होता, मात्र त्यांच्याविषयी वेळीच माहिती प्राप्त झाल्याने या तरुणांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.
या तरुणांची चौकशी केल्यानंतर काही धक्कादायक माहिती पोलिसांना प्राप्त झाली आहे. या तरुणांनाचेही ब्रेनवॉश करून त्यांना विदेशात नेण्यात येणार होते. त्यांना इसिसमध्ये सामिल करण्याचा त्यांच्या प्रयत्न होता. मात्र या सर्व तरुणांना पोलिसांनी चौकशीनंतर सोडून दिले आहे.
[EPSB]
मुंबईतील तीन तरुण इसिसमध्ये?
मुंबईतील मालवणी भागातील तीन तरुण बेपत्ता असून हे तिघे ‘इसीस’ या दहशतवादी संघटनेमध्ये सहभागी झाल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.
[/EPSB]