माथेरान मिनी ट्रेन इंजिन रुळावरून घसरण्याच्या घटना सुरूच आहे.
माथेरान- माथेरान मिनी ट्रेन इंजिन रुळावरून घसरण्याच्या घटना सुरूच आहे. सोमवारीही माथेरान रेल्वे स्थानकात प्रवेश करताच मिनी ट्रेनचे इंजिन घसरले.
नेरळहून ९.२० वाजता सुटलेली ट्रेन ११.०० वाजता माथेरान स्थानकात पोहोचत असताना रुळावरून घसरली. यावेळी गाडी प्रवाशांनी भरली होती. इंजिन घसरल्याने मोठा आवाज झाला, त्यामुळे प्रवासी घाबरले. मात्र, चालकाने वेळीच नियंत्रण आणल्याने गाडी थांबवली. यावेळी गाडीचा वेग कमी होता.
एकाच ठिकाणी चार वेळेस इंजिनाला अपघात
मागील एक महिन्यात या ठिकाणी चार वेळेस इंजिन घसरण्याच्या घटना घडल्या आहेत. या बाबत ठोस उपाययोजना करण्यात रेल्वे प्रशासन कमी पडत आहे.
इंजिनाच्या तात्पुरत्या दुरुस्ती केल्या जात असल्याने ठोस उपाययोजनेअभावी असे अपघात घडत आहेत. इंजिन घसरल्याने माथेरानहून नेरळकडे जाणारी गाडीही रद्द करण्यात आली. अशा अपघातांमुळे ट्रेनच्या फे-या रद्द केल्या जातात. परिणामी पर्यटन व्यावसायावरही त्याचा विपरीत परिणाम होत आहे.