कर्जत तालुक्यातील माणगाव ग्रुपग्रामपंचायतच्या रिक्त असलेल्या उपसरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्या प्रेरणा कराळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
नेरळ – कर्जत तालुक्यातील माणगाव ग्रुपग्रामपंचायतच्या रिक्त असलेल्या उपसरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्या प्रेरणा कराळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
माणगाव ग्रुपग्रामपंचायतच्या रिक्त असलेल्या उपसरपंचपदासाठी सरपंच कुंदा आवाटे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा घेण्यात आली. त्यावेळी निर्धारित वेळेत निवडणूक पीठासीन अधिकारी सरपंच आवाटे यांच्याकडे प्रेरणा कराळे यांचा एकमेव नामांकन अर्ज दाखल झाला. त्यामुळे पीठासीन अधिका-यांनी माणगाव ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी प्रेरणा कराळे यांची निवड झाल्याचे जाहीर केले. विशेष सभेला ग्रामपंचायत सदस्य संगीता पेमारे, शिवाजी टोकरे, शिवाजी कराळे, प्रेरणा कराळे, कुंदा आवाटे, आरती खारीक, राजश्री ठोंबरे, विनोद बासरे, कल्पना भोईर आदी उपस्थित होते. निवडणूक कामी पीठासीन अधिकारी कुंदा आवाटे यांना ग्रामविकास अधिकारी संजय बढे यांनी सहकार्य केले.
उपसरपंचपदी निवड झाल्यानंतर प्रेरणा कराळे त्यांचे अभिनंदन रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे, माजी सरपंच नंदा कराळे, नेरळ ग्रामपंचायतचे सदस्य मंगेश म्हसकर आदी उपस्थित होते.