देशात स्टार्ट अप, स्टँड अप इंडियासारख्या योजना राबवल्या जात असल्या तरीही समाजातील काही जण या लाभांपासून वंचित आहेत.
मुंबई – देशात स्टार्ट अप, स्टँड अप इंडियासारख्या योजना राबवल्या जात असल्या तरीही समाजातील काही जण या लाभांपासून वंचित आहेत. त्यांच्या मदतीसाठी पंजाब नॅशनल बँक आणि कोळी महासंघाने पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्रातील महिलांना उद्योगासाठी कर्ज देण्यासाठी पंजाब नॅशनल बँकेच्या प्रबंध निदेशक उषा अनंतसुब्रमण्यम आणि कोळी महासंघ ट्रस्टचे अध्यक्ष रमेश दादा पाटील यांनी एकत्र काम करण्याचे ठरवले आहे.
त्यानुसार महाराष्ट्रातील ३० हजार महिलांना सक्षम करण्यासाठी पंजाब नॅशनल बँकेच्या माध्यमातून कर्ज देण्यात कोळी महासंघाने पुढाकार घेतला असून महिलांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून दिले जाणार आहे. यानुसार मुंबईत नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात पंजाब नॅशनल बँकेतर्फे ५०० महिलांना कर्ज वाटप केले.