Sunday, July 7, 2024
Google search engine
Homeमध्यंतरसुखदामहिला सक्षमीकरणासाठी ‘खबर लहरिया’

महिला सक्षमीकरणासाठी ‘खबर लहरिया’

आजही स्त्रियांचं समाजातलं स्थान हे नेहमी दुय्यम म्हणूनच गृहीत धरलेलं आहे. भारतासारख्या पुरुषप्रधान संस्कृती असलेल्या देशातील काही राज्यांमध्ये दुर्दैवानं आजही स्त्रियांचा सर्वागीण विकास तर सोडाच; परंतु त्यांचे प्रश्न, समस्या यांबाबत मोठय़ा प्रमाणात अनास्था दिसून येते. अशी प्रतिकूल परिस्थिती असतानाही उत्तर प्रदेशमधल्या ग्रामीण भागांतल्या महिलांनी ‘खबर लहरिया’ हे स्थानिक भाषेतलं वर्तमानपत्र सुरू केलं. महिलांच्या विविध समस्या, प्रश्न मांडण्याबरोबर समाज प्रबोधन आणि महिला सक्षमीकरणासाठीचं एक खुलं व्यासपीठ म्हणून या माध्यमाचा उपयोग केला जात आहे. त्यांच्या या प्रयत्नाची दखल घेऊन ‘खबर लहरिया’च्या संकेतस्थळाला समाज प्रबोधनासाठी जर्मनीचा ‘द बॉब्स’ (बेस्ट ऑफ ऑनलाइन अ‍ॅक्टिव्हिजम) स्पेशल ग्लोबल मीडिया फोरम’ हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.
40 WOMEN TEAM‘चूल आणि मूल’ सांभाळतानाच, विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातल्या विकासाचा स्त्रियाही एक अविभाज्य भाग बनल्या आहेत. ग्रामीण भागातही हे तंत्रज्ञान हळूहळू झिरपत आहे. उत्तर प्रदेश आणि बिहार प्रांतातल्या मागास ग्रामीण जीवनाशी एकरुप झालेल्या स्त्रियांनी त्यांच्या जीवनाला दिशा देण्यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेतली आहे. वृत्तपत्रमाध्यमाच्या मदतीने या स्त्रिया त्यांचं आयुष्य बदलण्याचा प्रयत्न करत आहेत.  त्यांच्याच प्रयत्नांतून सुरू झालेलं ‘खबर लहरिया’ हे वर्तमानपत्र. ग्रामीण भागातील महिलांनी पुढाकार घेऊन सुरू केलेल्या या वर्तमानपत्राची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली गेली आहे. या वृत्तपत्राचं वैशिष्टय़ म्हणजे हे आठ पानी साप्ताहिक वर्तमानपत्र ४० ग्रामीण महिला पत्रकार काढतात. या वर्तमानपत्राच्या संपादक, उपसंपादक, पत्रकार, मार्केटिंग, प्रिटिंग तज्ज्ञ, वितरक या व इतर कोणत्याही जबाबदा-या सर्वस्वी महिला पार पाडतात. महिलांचे प्रश्न, समस्या यांची स्थानिक भाषांमध्ये मांडणी केली जात असल्यानं हे वर्तमानपत्र स्थानिक स्त्रियांशी अधिक प्रभावीपणे जोडलं गेलंय. येथील महिलांचं एक संपर्कजाळं निर्माण करणार हे साप्ताहिक वृत्तपत्र आज या स्त्रियांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी त्यांच्या हातातील प्रभावी माध्यम बनलं आहे.
दिल्लीतील ‘निरंतन’ या स्वयंसेवी संस्थेनं हे वर्तमानपत्र सुरू केलं. महिला सक्षमीकरणासाठी ही संस्था काम करते. उत्तर प्रदेश आणि बिहार सारख्या प्रांतात अशा पद्धतीचं काम सुरू करताना, या माध्यमातून ग्रामीण महिला त्यांची मत, कल्पना मांडू शकतील, असं व्यासपीठ उपलब्ध करून द्यावं, ही तिथल्या महिलावर्गाची गरज होती. याच पायाभूत संकल्पनेतून २००२ मध्ये उत्तर प्रदेशच्या चित्रकुटमधून सुरुवातीला बुंदेली या स्थानिक भाषेतून हे वर्तमानपत्र सुरू झालं. आता हे वर्तमानपत्र भोजपुरी, अवधी, हिंदुस्थानी आणि बज्जिका या स्थानिक भाषांमध्येही प्रसिद्ध होत आहे. ‘खबर लहरिया’चा शब्दश: अर्थ होतो ‘बातम्यांचा प्रवाह’ असा होतो. ‘आप की खबर, आप की भाषा में!’ असं ब्रीदवाक्य असलेले हे वर्तमानपत्र उत्तर प्रदेश आणि बिहारपुरतं मर्यादित आहे. या राज्यांतल्या ज्या बातम्या राष्ट्रीय माध्यमांकडून वगळल्या जातात किंवा ज्यांची दखल घेतली जात नाही अशा बातम्यांना स्थानिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘खबर लहरिया’ महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे, अशी माहिती ‘खबर लहरिया’च्या संपादकीय समन्वयक पूर्वी भार्गव यांनी दिली.  या वर्तमानपत्रांच्या दिवसाला ६ हजार प्रती छापल्या जातात. उत्तर प्रदेश आणि बिहारमधला ग्रामीण समाज हा या वर्तमानपत्राचा सर्वात मोठा वाचक वर्ग आहे. गरिबी, निरक्षरता, लिंगाधारित आणि जातीय हिंसाचार, स्त्रियांचा घटता जन्मदर, आरोग्याच्या अपु-या सुविधा आणि रोजगाराच्या संधी या प्रमुख मुद्यांवर प्रामुख्याने या वर्तमानपत्रात भर दिला जातो. थोडक्यात महिलांचे प्रश्न, समस्या मांडून त्यावर मात करून सक्षमीकरणाकडे वाटचाल करण्यासाठी हे वर्तमानपत्र तेथील महिलांचा आधार बनत आहे. २०१३ साली खबर लहरियाची ऑनलाईन आवृत्ती सुरू करण्यात आली. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला. आता खबर लहरियाच्या वर्तमानपत्राचे व ऑनलाईन आवृत्तीचे आतापर्यंत ८० हजार वाचक आहेत.
नुकतंच ‘खबर लहरिया’च्या संकेतस्थळाला समाज प्रबोधनासाठी जर्मनीचा ‘द बॉब्स’ (बेस्ट ऑफ ऑनलाइन अ‍ॅक्टिव्हिजम) स्पेशल ग्लोबल मीडिया फोरम’ हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. उत्तर प्रदेश आणि बिहारमधल्या ग्रामीण भागातल्या महिलांच्या परिश्रमांची दखल घेऊन त्यांचा करण्यात आलेला गौरव ही अत्यंत गौरवास्पद आणि प्रेरणादायी बाब असल्याचं मतही पूर्वी भार्गव यांनी हा पुरस्कार स्वीकारताना व्यक्त केलं.
त्या सांगतात की, ‘‘अंक सुरू करण्याआधी प्रशिक्षणादरम्यान सुरुवातीच्या काही अंकांसाठी स्थानिकांच्या जिव्हाळ्याच्या मुद्दय़ांवर काही लेख लिहिले. जे इथल्या लोकांना अतिशय आवडले आणि तेही या उपक्रमाशी जोडले गेले. इथल्याच काही सुशिक्षित जाणकारांनी आपण केवळ स्थानिक भागातले ग्रामीण प्रश्न आणि समस्या मांडणारं वर्तमानपत्र सुरू करूया, असं सुचवलं आणि त्या दृष्टीनं प्रयत्न सुरू केले.’’
‘खबर लहरिया’साठी काम करू इच्छिणा-या मुली-स्त्रियांना, विशेषत: विवाहितांना घरातून तीव्र विरोध झाला. कारण घर आणि घरची कामं सोडून स्त्रियांना इतर काही महत्त्वाचं काम असूच शकत नाही आणि त्यांनी कामानिमित्तही संध्याकाळनंतर घराबाहेर राहू नये, अशी तिथल्या पुरुषांची मानसिकता होती. पण या स्त्रियांनीच घर आणि वर्तमनपत्राचं कामकाज दोन्हीचं संतुलन राखत त्यांच्या घरच्यांना ही त्यांची आवड, त्यांची क्षमता दाखवून दिली आणि चित्र बदलू लागलं. काम करण्यास इच्छुक असणा-या महिलांच्या घरी ‘खबर लहरिया’च्या टीमचे सदस्य वारंवार जाऊन त्यांचं प्रबोधन करण्याचं काम करतच होते. परंतु अजूनही स्थानिक प्रशासनात पुरुषांचंच वर्चस्व असल्यानं आम्हाला त्यांचं सहकार्य होण्याऐवजी अनेक अडथळे निर्माण होत असतात. महिला पत्रकार म्हणूनही इथलं प्रशासन आम्ही उपस्थित करत असलेल्या मुद्दय़ांना गंभीरतेनं घेत नाही, अशी खंत भार्गव व्यक्त करतात.
ग्रामीण भागात अजून इंटरनेट सेवेची मोठय़ा प्रमाणात वानवा आहे. अशा परिस्थितीत या वर्तमानपत्राची मोबाईल आवृत्ती कशी सुरू करता होईल, याबाबतही विचार सुरू आहे. सध्या मोबाइल फोनमध्ये इंटरनेट उपलब्ध होत असल्यामुळे ‘खबर लहरियॉँ’ची आवृत्ती लवकरच मोबाइलवरही उपलब्ध होईल, अशी माहिती भार्गव यांनी दिली. सध्या तरुणवर्ग मोठय़ा प्रमाणात ‘इंटरनेट फ्रेण्डली’ असलेले मोबाइल फोन प्राधान्यानं घेत असल्यामुळे त्या दिशेनं विचार सुरू आहे.
‘खबर लहरिया’चा आतापर्यंतचा प्रवास सुखकर सुरू असला तरी या मार्गात अनेक आव्हानं आहेत. ‘खबर लहरिया’चा एक अंक छापण्यासाठी २२ रुपये खर्च येतो. मात्र, अंक २ रुपयांना विकला जातो. त्यामुळे हा २० रुपयांचा तोटा संस्थेला सहन करावा लागतो. त्याचबरोबर इतरही स्थानिक भाषांमध्ये वर्तमानपत्र सुरू असल्यामुळेही खर्च वाढत आहे. हा तोटा कमी करण्यासाठी आणि महसुलात वाढ करण्यासाठी विविध माध्यमांमध्ये विस्तारीकरणाचा व विविध मार्ग अवलंबण्याबाबत विचार सुरू आहे.
‘खबर लहरिया’ हे केवळ स्त्रियांचे प्रश्न वा समस्या मांडणारं वर्तमानपत्र नाही, तर बुंदेलखंडसारख्या दारिद्रयात पिचलेल्या शिवाय साक्षरतेचं अत्यल्प प्रमाण, लिंगभेद आणि जातीवाचक हिंसक वातावरण, आरोग्यशिक्षण आणि रोजगाराच्या संधींचा अभाव असलेल्या भागातल्या महिलांमध्ये साक्षरता, त्यांच्या अधिकारांची जाणीव करून देण्यासाठीचं हे एक भक्कम माध्यम आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

राजेंद्र डोरले on सोरायसिस बरा होऊ शकतो!!
राजेंद्र डोरले on सोरायसिस बरा होऊ शकतो!!
मुकुंद बालाजी जाधव on हळद शेती करूया; श्रीमंत होऊया!
हेमंत तुळशीराम म्हस्के. on विकासाची नवी संधी : बटेर पालन
राजेश सावंत on वा रे सत्ताधीश
उढाणे अमोल दिनकर on विधान परिषद प्रश्नोत्तरे
राम आप्पा यमगर on संपर्क
कमलकांत देशमुख on .. तर तक्रार कुठे करायची?
Harshada maruti kulkarni on संदेसे आते थे..
शिवाजी वटकर on कविता म्हणजे काय?
Deepti jadhav on संपर्क
बाळासाहेब सुखदेव बो-हाडे on घरच्या घरी फायदेशीर व्यवसाय
राज कालापाड on कविता म्हणजे काय?
अमोल वसंतराव कुर्जेकर रा ,मंगलादेवी ता . नेर .जि . यवतमाळ on संपर्क
तुळशीदास धांडे on घराचं नामकरण..
Kunal Someshwar Kamble on भारत बंदला हिंसक वळण- मध्य प्रदेशातील ग्वालिअर आणि मुरैना येथे झालेल्या हिंसाचारात ४ जणांचा मृत्यू, मध्य प्रदेशमधील मुरैना येथे एका युवकाचा मृत्यू; राज्यातील काही भागांमध्ये संचारबंदी, ग्वाल्हेरमध्ये झालेल्या हिंसाचारात १९ जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक, राजस्थानमधील बाडमेरमध्ये आंदोलनकर्त्यांनी वाहनांना आग लावली. मध्य प्रदेश, राजस्थानमधील काही जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा उद्या सायंकाळपर्यंत बंद, मेरठमध्ये बंदला हिंसक वळण; आंदोलनकर्त्यांनी वाहनांना आग लावली, नागपुरमध्ये आंदोलकांनी इंदोरा चौकात बसला आग लावली, जालना येथे दलित संघटनांनी पुकारलेल्या भारत बंद दरम्यान अंबड चौफुलीजवळ एसटीसह एका जीपच्या काचा फोडल्या.
बाळासाहेब सिताराम धुमाळ on आमच्या बद्दल
नवनाथ विष्णू म्हेञे on अपंगांच्या नावाने..
स्वप्नील चीचोलकर on शाळेच्या सुखद आठवणी
सुशांत सुरणकर on अभिजात भाषा
Sangam polkamwad on आळशी मांजर
Sawle Dnyaneshvar motiram sawal on सर्वश्रेष्ठ देहदान
आळंदे रघुनाथ शंकर. मु. पो. ता. राधानगरी (कोल्हापुर) on शिक्षकांचे पगार होणार ‘ऑफलाईन’
santosh shingade on संपर्क
PRASHANT B SONTAKKE on संपर्क
Vinayak Sarvanje on संपर्क
Rohit Jadhav on संपर्क
श्रीकांत ओक, उर्फ ओक काका सिंहगड रोड, पर्वती, पुणे-30 on प्राचीन गोंडवन महाखंडाचे कोडे उलगडले
दत्ताराम प्रकाश गोरीवले on दृष्टिहिनांची काठी तंत्रज्ञान
ravindra gawade on संपर्क
..प्रकाश जोशी on तेहतीस कोटी देव कोणते?
..प्रकाश जोशी on तेहतीस कोटी देव कोणते?
प्रा. विठ्ठलराव भि. ख्याडे (बारामती) on भटक्या कुत्र्यांची दहशत कायम
शिवाजी उत्तमराव पवार on सदाभाऊंची ‘रयत क्रांती संघटना’
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Adinath Kinge on दगडफूल
महाराष्ट्र डिजिटल सेवा केंद्र on हेल्पलाइन
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Narendra rathod on Aashish Kataria
Yogesh Bhati on भयाचे भूत..
Rahul on E-Book
Satish Pakhre on NEW LIVE SCORECARD 1
जितेंद्र शांताराम म्हात्रे on उत्तम मार्गदर्शन गरजेचे
SALMAN KHAN on संपर्क
विवेक प्रदिप भोसले on नेमबाजी प्रशिक्षण
Uday Nagargoje on ५१ मध्ये ७
vikas mayekar on मूक मोर्चा
अशोक भेके on RSS NEWS
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
भाई, लय भारी!!! भाई जोरात, बाकी सगळे भ्रमात!!!!! on चिपळुणातील राष्ट्रवादीचे सर्वाधिकार रमेश कदम यांच्याकडे!
अशोक भेके on महात्मा…
अशोक जी मांजरे on संपर्क
कुवर सुनिल वेच्या on सातबारा : आपल्या मोबाईलमध्ये..
अशोक भेके on आमच्या बद्दल
अशोक भेके on संपर्क
mahesh kadam on रामघळ
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
KVRaman on Advertise with us
KVRaman on Advertise with us
श्रीकांत धर्माळे on दातेगड ऊर्फ सुंदरगड
भारती बिबिकर on भूरीभद्रेचे परोपकार
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
शहाजी भोसले on प्रचितगडाची प्रचिती
Amit Avikant Jadhav on आमच्या बद्दल
DATTATRAY KADAM PLEASE GIVE AHOME TO GIREENI KAMGAR EMERJENCY on घरांची ९ लाख किंमत कामगार भरणार कुठून?
SAMBHAJI BHOITE on अनुभव
भारती बिबिकर on भुजंगासन
भारती बिबिकर on एकटेपणाची सल
भारती बिबिकर on वास्तवादी अभिनेता
गजानन किशनराव पिंपळगावकर on अपंगांच्या नावाने..
rajesh on संपर्क
Mahesh on संपर्क
सौ. अनिता पाटील on उद्योग करायचाय, पण कोणता?
anil rangankar on फसवणूक
Uday Tayshete on भीषण आग..
bipin b bagwe on आज टिप ऽऽर!
सुनिल गुरव on Live Score Card
राजेश पां मालवणकर. on दत्तकांचे अनाथालय!
राजेश पां मालवणकर. on दत्तकांचे अनाथालय!
श्याम कुवळेकर on पैसा झाला मोठा!
sachin jawanjal on संपर्क
Siddhartha Patil on संपर्क
रविंद्र सोनवणे on पाण्याचा वापर जरा जपून..
रविंद्र सोनवणे on पाण्याचा वापर जरा जपून..
भारतीय शस्त्रे हा ऍक मुलभुत पाÀ€à¤¯à¤¾ आहे on भारतीय संरक्षण सिद्धता मजबूत
विजय कुडतरकर on माझी आई
ऋषिकेश पवार on थांबा, २५ वर्षे!
राम मनजुळे on वाँटेड बायको नंबर १
chandrakant raulwar on बोलबच्चन मोदी
विद्याधर पोखरकर on आविष्कार शोधणार नाटककार!
anil surwase on संपर्क
अभिमन्यू यशवंत अळतेकर on मुस्लिम असल्याने नोकरी नाकारली
anil rangankar on वैशाख वणवा
prabhakar pawar on आजोळचे दिवस
rajesh on संपर्क
leenal gawade on संपर्क
anil rangankar on कचरा नकोच!
Trupti Rane on मनातलं
श्री. दत्तात्रेय मस्के on संपर्क
भास्करराव यमनाजी नरसाळे on शिवसेनेवर कसा विश्वास ठेवायचा?
Trupti Rane on मनातलं
Prachi K on मनातलं
मुबादेवी दागीना बाज़ार एसोसिएशन on उत्सवांतील गोंगाट थंडावणार!
SHRADDHA on मनातलं
Rajeev Atmaram Rale on पारधीचे पोस्त
Trupti Rane on मनातलं
Trupti Rane on मनातलं
rajani kulkarni on मनातलं
rohini joshi on मनातलं
rajesh on संपर्क
Ganesh Shetgaonkar on संपर्क
Suhas Ramchandra Keer on खाकीला डाग!
Shubhangi bhargave on अच्छा लगता है
Ajay Godbole on Prahaar Smartkey Solution
गणेश शिवराम घाणेकर on रघुराम राजन ‘गव्हर्नर ऑफ इयर’
पुंडलिक कोलम्बकर on आमच्या बद्दल
Paresh baba on सिगारेट
raghunath pawar on Prahaar Smartkey Solution
चंद्रशेखर दत्तात्रय पिलाणे on संस्कृतीचे भक्कम शिलेदार वीरगळ
भात मळणी मशिन on भातझोडणी झाली सोपी
rahul on गु-हाळ
mandaar gawde on जिंकणारच!
Apurva Oka on पाणी
नीलेश यशवंत केळकर . on होय, माझा पराभव झाला!
Chitra Bapat on पाणी
Nitin Shrikant Parab on जिंकणारच!
SANDIP PASHTE on जिंकणारच!
Suhas Ramchandra Keer on चमकेशगिरी
अर्चना तेलोरे on जीवघेणा आगाऊपणा
प्रथमेश मिलिंद कुलकर्णी on रुपक त्रिपुरारी पौर्णिमेचे
Reena patil on दहीहंडी
हेमंतकुमार दिक्षित on वैरीण वाटे टेप
Siddhesh T. Bavkar on वाघ तो वाघच
विद्याधर बबन पोखरकर on पाऊस हसतो आहे!
Sachin Ambadas Dabhade on स‘माज’
दिनेश गांवकर/विजय भालेकर on माझ्या जन्मभूमीतच माझा पराभव!
Prakash Dalvi on विजय सलामी
#‎प्रहारन्यूज‬ Sabse FAST NEWS on एक रुपयात पाणी
madhuri onkar vartale on नाच रे मोरा…
मनोज कापडे on फॅमिली फार्मिग
dattaram gandhare on रेल्वे ठप्प
JAIDEEP SAWANT on “सिंग साहब
Sunil Patil on ऊस पेटला
किशोर कुलकराणी on साक्षरता ‘म मराठी’ची!
madhuri vartale on पेन स्टॅण्ड
प्रा. बालाजी शिंदे ,नेरूळ on श्रीलंकेत उभारणार डॉ. आंबेडकर भवन
प्रबोध मधुकर माणगावकर, कोलशेत, ठाणे on हॅटट्रिक करणार!
कमलाकर दत्तात्रेय गुर्जर on कोकण रेल्वेचे डबे वाढवा!
कमलाकर गुर्जर, कळवा on भाजीविक्रीत दलाल नकोत !
कमलाकर गुर्जर, कळवा on मरण स्वस्त! जगणे महाग!!
Dinesh Dhanawade on आनंदाची चाळ
प्राची गुर्जर, कळवा on जबाबदारी सर्वाची
प्राची गुर्जर, कळवा on ‘राव’डी मागणी!
ज्ञानेश एकनाथराव (नाना) कणसे on ‘राव’डी मागणी!
प्राची गुर्जर, कळवा on शिक्षणाचे वाजले बारा!
राजेश्वरी सावंत on मुसळधार..!..बेहाल..!!
Vinod Raje on महाकुंभ
विकास वि. देशमुख on औषध विक्रेत्यांची मनमानी
दीपक पाटणे on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
अभिषेक सावंत on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
तेजस्विनी मोरे on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
रवींद्र खैरनार on सैतानाचा बाप
एक सांताकृझवासी on एसीपी वसंत ढोबळे यांची बदली
समीर कारखानीस, मुंबई. on दोन भारतीय सैनिकांचा शिरच्छेद
समीर कारखानीस, मुंबई. on …तर परिणाम वाईट होतील
पवनकुमार बंडगर on आता तरी… जागे व्हा!
amit padwal on सुखोई सफर
समीर, मुंबई on कसाब फासावर
प्रहार प्रतिनिधी on ऑस्करची ‘बर्फी’ आंबट