महिला पोलिस अधिका-याच्या जाचाला कंटाळून एका २५ वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
![sucide 1](http://prahaar.in/wp-content/uploads/2012/08/sucide-1-204x300.jpg)
नाशिक – महिला पोलिस अधिका-याच्या जाचाला कंटाळून एका २५ वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या तरुणाला माझ्याशी लग्न कर किंवा तीन लाख रुपये खंडणी दे अशा प्रकारची मागणी या महिला पोलिस अधिका-याने केली होती.
दिपक सावकार बर्वे (२५) असं या तरुणाचे नाव असून नाशिकमधील भोरटेंभे गावात राहत होता. दिपकचे रविवारी त्याचे लग्न होणार होते. मात्र त्यापूर्वीच शिळापूरजवळील धावत्या गाडीखाली जीव दिला. त्याने मृत्यूपूर्वी लिहिलेल्या पत्रात नाशिक ग्रामीण पोलिस मुख्यालयातील मनिषा कुंजूरे हीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
दिपकच्या वडिलांनी पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली असून आत्तापर्यंत मनिषा कुंजूरे हिच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.