महिला वैमानिकांकडे आता फायटर विमानांची जबाबदारी सोपवण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे हवाई दलाचे प्रमुख एअर चिफ मार्शल अरूप राहा यांनी सांगितले.
नवी दिल्ली- भारतीय हवाई दलात विविध जबाबदा-या संभाळणा-या महिला वैमानिकांकडे आता फायटर विमानांची जबाबदारी सोपवण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे हवाई दलाचे प्रमुख एअर चिफ मार्शल अरूप राहा यांनी सांगितले.
ते ८३ व्या वर्धापनदिनी कार्यक्रमात बोलत होते. लवकरच भारतीय हवाई दलात महिला वैमानिकांचा समावेश करण्यात येईल, असे ते म्हणाले.
आपल्याकडे सध्या हेलिकॉप्टर आणि विमाने महिला वैमानिक चालवितात. मात्र महिलांच्या सुरक्षिततेच्या भीतीने हवाई दलाने यापूर्वी लढाऊ विमान महिलांना चालविण्याची परवानगी दिली नव्हती.
मात्र २०१० साली शासकीय सेवांसाठी महिला अधिकारी पात्र असल्याचा निर्णय दिल्ली उच्च न्यायालयाने दिला.
या निर्णयामुळे हवाई दलात महिलांना संपूर्ण सेवेची संधी मिळाली असून आता लढाऊ विमान चालविण्याची संधी देण्याचा प्रस्ताव नियोजित करण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले.
सध्या भारतीय हवाई दलात सुमारे ३०० महिला पायलट आहेत.