महाराष्ट्र राज्य हे पेड न्यूजची राजधानी असल्याचे खळबळजनक विधान निवडणुक आयुक्त एच.एस. ब्रह्मा यांनी केले आहे.
मुंबई- महाराष्ट्र राज्य हे पेड न्यूजची राजधानी असल्याचे खळबळजनक विधान निवडणुक आयुक्त एच.एस. ब्रह्मा यांनी केले आहे. राज्यातील पत्रकार आणि वृत्तपत्रांनी पेड न्यूजची परंपरा बंद करावी असे आवाहन त्यांनी केले.
राज्यात मोठ्या प्रमाणात पेड न्यूज दिल्या जातात त्यातून मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार होतात. पेड न्यूजची राजधानी म्हणून महाराष्ट्राकडे पाहिले जाते. अशा प्रकारचे बातम्या देण्याचे बंद करा असे खळबळ जनत विधान ब्रह्मा यांनी केले.
यासंदर्भात तीन प्रादेशीक आणि छोट्या राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी आयोगासोबत झालेल्या बैठकीत ही तक्रार केल्याचे ब्रह्मा यांनी सांगितले. राज्यातील प्रसारमाध्यमे आमच्या पक्षाच्या बातम्या देत नसल्याची तक्रार त्यांनी केल्याचे ब्रह्मा म्हणाले.
गेल्या काही वर्षांमध्ये राज्यात झालेल्या निवडणुकांमध्ये पेड न्यूजचे प्रमाण वाढले असून यावर प्रसारमाध्यमांनी स्वःनियंत्रण ठेवावे असेही ब्रह्मा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या पत्रकार परिषदेला मुख्य निवडणूक आयुक्त व्ही.एस.संपत उपस्थित होते. ब्रह्मा यांच्या या विधानावर पत्रकारांनी खुलासा विचारल्यावर संपत यांनी मात्र निवडणूक आयोगाला असे वाटत नसल्याचा खुलासा केला.