महाराष्ट्र दिन आणि कामगारदिनानिमित्त ठाणे, रायगड आणि वसईमध्येही रविवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. झेंडावंदन,
ठाणे- महाराष्ट्र दिन आणि कामगारदिनानिमित्त ठाणे, रायगड आणि वसईमध्येही रविवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. झेंडावंदन, रॅली, सांस्कृतिक कार्यक्रमांनी महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला.
कल्याणमध्ये तहसील कार्यालयात शासकीय ध्वजवंदन कार्यक्रम पार पडला. यावेळी पोलीस, गृहरक्षक दलाचे जवान यांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. यानंतर कल्याण-डोंबिवली महापालिका मुख्यालयात महापौर राजेंद्र देवळेकर यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले.
त्यावेळी महापालिका आयुक्त ई. रवींद्रन, सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त दीपक पाटील, स्थायी समिती सभापती संदीप गायकर यांच्यासह नगर सेवक व कार्यकत्रे उपस्थित होते.
कामगार कार्यकत्रे व कोयना वृत्तपत्राचे संपादक चंद्रशेखर ना.पाटील व जायन्ट्स ग्रुप ऑफ मेट्रोतर्फे आयोजित केलेल्या रॅलीला उत्तम प्रतिसाद मिळाला. या रॅलीत स्वच्छ भारत अभियान, स्त्री भ्रूण हत्या, पाणी वाचवा या विषयात जनजागृती करण्यात आली.
कल्याण पश्चिमेकडील नव्याने विकसित झालेल्या वसंत व्हॅली, माधव संकल्प, माधव सृष्टी, मोहिन्द्रसिंग शाळेचे विद्यार्थी नागरिक या रॅलीत सहभागी झाले होते. ठाणकरपाडा येथे साई सेवा प्रतिष्टान तर्फे आयोजित रक्तदान शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला.
धर्मराज्य या पर्यावरणवादी पक्षातर्फे कामगार दिनाचे औचित्य साधून कामगार क्षेत्रात आलेल्या कंत्राटी पद्धतीचा निषेध करण्यात आला. निवडणुकीच्या वेळी मतांची होणारी कथित अवैध विक्री, त्यातून खेळले जाणारे राजकारण, महाराष्ट्रात भाजपा शिवसेना युतीच्या कामगारविरोधी धोरणाचा छत्रपती शिवाजी चौक परिसरात धर्मराज्य पक्षाकडून निषेध करण्यात आला.
रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री कार्यक्रमास गैरहजर
महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ५६ वा वर्धापनदिन समारंभ रायगड जिल्ह्यात पालकमंत्री प्रकाश मेहता यांच्या अनुपस्थितीत पार पडला. पालकमंत्र्यांच्या गरहजेरीत जिल्हाधिकारी शितल उगले यांनी ध्वजारोहण केले आणि पोलीस मानवंदना स्विकारली.
रायगड जिल्ह्याच्या इतिहासात ध्वजारोहण सोहळ्याला पालकमंत्री हजर नसण्याची ही पहिलीच वेळ होती. १५ ऑगस्ट, २६ जानेवारी आणि १ मे या दिवशी जिल्हास्तरावर होणा-या मुख्य ध्वजारोहण समारंभाला त्या त्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी हजेरी लावावी आणि ध्वजारोहण करून मानवंदना स्विकारावी व संचलनाची पहाणी करावी हा राजशिष्टाचाराचा भाग मानला जातो.
जिल्ह्याचे पालकमंत्री असणारे लोकप्रतिनिधी मोठय़ा अभिमानाने या सोहळ्यांना हजेरी लावत असतात. पण महाराष्ट्र दिनाचे औचित्यसाधून अलिबागच्या पोलीस परेड मैदानावर आयोजित मुख्य ध्वजारोहण समारंभाला रायगडचे पालकमंत्री तथा राज्याचे गृहनिर्माण, खनिकर्म आणि कामगार मंत्री प्रकाश मेहता अनुपस्थित राहिले.
काही अपरिहार्य कारणाने पालकमंत्री अनुपस्थित राहिल्याचे यावेळी सांगण्यात आले. त्यामुळे आयत्यावेळी जिल्हाधिकारी शितल उगले- तेली यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे, पोलीस अधिक्षक सुवेझ हक, अप्पर जिल्हाधिकारी पी. डी मलिकनेर उपस्थित होते.
ध्वजारोहण झाल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी पोलीस पथकाची मानवंदना स्वीकारली. त्यानंतर विशेष कामगिरी केलेल्या अधिकारी कर्मचारयांचा त्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. खोपोलीचे पोलीस निरीक्षक सावता शिंदे, पोलीस हवालदार (मुख्यालय),श्रीकांत म्हात्रे,माणगाव विभाग उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता नलावडे, पोलीस निरीक्षक(अलिबाग) तुकाराम पवळे,दिघी सागरी पोलीस ठाणेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय मोगले, नेरळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रिवद्र पाटील,आदर्श तलाठी पुरस्कार विजेते सी.एस.राऊत यांचा जिल्हाधिकारी उगले यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
अलिबागमध्ये पीएनपी ग्रुपतर्फे हुतात्म्यांना आगळीवेगळी आदरांजली
महाराष्ट्राच्या निमित्र्तीसाठी ज्या हुतात्म्यांनी बलिदान दिले त्या महापुरुषांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून पीएनपी ग्रुपतर्फे अलिबाग समुद्रकिनारी वाळू शिल्पाच्या माध्यमातून आगळीवेगळी आदरांजली अर्पण करण्यात आली.
अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या हस्ते मशाल प्रज्वलित करून या शिल्पाचे अनावरण करण्यात आले. यावेळी पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील, उपनगराध्यक्षा सुरक्षा शाह, नगरसेविका अॅड. मानसी म्हात्रे, नगरसेवक प्रदिप नाईक, संदिप शिवलकर, राकेश चौलकर, वृषाली ठोसर, रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष नागेश कुलकर्णी, पीएनपी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या संजीवनी नाईक, एमबीए कॉलेज प्राचार्य अनुज मिश्रा, बी. एड प्राचार्या रुतुषा पाटील, माध्यमिक शाळा मुख्याध्यापक निलेश मगर, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका रिना म्हात्रे, जनसंपर्क अधिकारी अमोल नाईक, सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
कर्जतमध्ये ध्वजारोहणाला नगरसेविकांची उपस्थिती मात्र नगरसेवकांची पाठ कर्जत तालुक्यात महाराष्ट्र दिनानिमित्त ठिकठिकाणी ध्वजारोहणाचा सामारंभ आयोजित करण्यात आला होता. कर्जत नगर परिषदेच्या प्रांगणातील ध्वजारोहण प्रसंगी महिला नगरसेवकांची उपस्थिती होती. मात्र नगरसेवकांनी पाठ फिरवल्याचे चित्र होते.
कर्जतमध्ये राज्य स्थापनेचा ५६ वा वर्धापन दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कर्जत नगरपालिकेच्या प्रांगणातील ध्वजारोहण नगराध्यक्ष राजेश लाड यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी मुख्याधिकारी दादाराव आटकोरे, उपनगराध्यक्ष पुष्पाताई दगडे, विरोधी पक्ष नेत्या यमुताई विचारे, नगरसेविका रजनी गायकवाड, सुवर्णा जोशी, सई वारे या नगरसेविका उपस्थित होत्या.
मात्र एकही पुरुष नगरसेवक उपस्थित नव्हता. तसेच डॉ. शशिकांत देसाई, मोरेश्वर शहासने, नितीन परमार, आदींसह कर्मचारी वर्ग उपस्थित होता. कर्जत तहसील कार्यालयातील ध्वजारोहण आमदार सुरेश लाड यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी उपसभापती मनोहर थोरवे, प्रांत अधिकारी दत्तात्रय भडकवाड, तहसीलदार रविंद्र बाविस्कर, गट विकास अधिकारी महादेव म्हात्रे, उपविभागीय पोलीस अधिकारी शालिग्राम पाटील, पोलीस निरीक्षक रमेश भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे, नायब तहसीलदार राजेंद्र घायाळ, रमेश देशमुख, किरण पाटील आदींसह कर्मचारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
कोंकण ज्ञानपीठ कर्जत महाविद्यालयातील ध्वजारोहण प्राचार्य डॉ. रवींद्र देशमुख यांच्या हस्ते, पंचायत समिती कार्यालयातील ध्वजारोहण सभापती सुवर्णा बांगारे यांच्या हस्ते, उपविभागीय अधिकारी कार्यालयातील ध्वजारोहण प्रांताधिकारी दत्तात्रय भडकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील ध्वजारोहण उपविभागीय पोलीस अधिकारी शालिग्राम पाटील, पोलीस ठाण्यातील ध्वजारोहण पोलीस निरीक्षक रमेश भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.