रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीतरर्फे, ‘महाराष्ट्रातील दुष्काळ : स्वरूप आणि उपाययोजना’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी प्रत्येक महिन्यात ‘गुरुवार सभा’ नावाचा उपक्रम राबवते. या सभेमध्ये प्रचलित विषय आणि घडामोडी यावर तज्ज्ञ मंडळी मार्गदर्शन करतात. आज ९ मे रोजी या सभेचं आयोजन केलं असून, ‘महाराष्ट्रातील दुष्काळ : स्वरूप आणि उपाययोजना’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. या व्याख्यानावर बोलण्यासाठी दुष्काळाची समस्या सोडवण्यासाठी आदर्श निर्माण करणारे पोपटराव पवार उपस्थित राहणार आहेत.
’स्थळ : १७, चंचल स्मृती, गं. द. आंबेकर मार्ग, श्रीराम इंडस्ट्रीअल इस्टेट समोर, वडाळा, दादर(पू.)
’वेळ : सायं ६.३०
पृथ्वी थिएटरमध्ये नाटयोत्सव
रंगबाज ग्रूपतर्फे पृथ्वी थिएटरमध्ये दोनदिवसीय नाटय़ोत्सव आयोजित केला आहे. गुरुवार ९ मे रोजी राघव दत्त लिखित आणि दिग्दर्शित ‘बावला’ या नाटय़प्रयोगाचे सायं. ७ आणि रा. ९ असे दोन प्रयोग सादर केले जाणार आहेत. तर रुडयार्ड किप्लिंग्ज यांच्या ‘द जंगल बुक’ या कादंबरीवर आधारित शिवानी टांकसाळे आणि सुमित व्यास दिग्दर्शित ‘जंगल बुक’ ही नाटयकृती गुरुवार ९ मे आणि शुक्रवार १० मे या दोन्ही दिवशी स. ११ आणि दु. ३ वाजता सादर होणार आहे. ‘बडे मियॉँ दिवाने’ या इमरान रशिद दिग्दर्शित कौटुंबिक नाटय़ाचे दोन प्रयोग शुक्रवारी सायं. ७ आणि रा. ९.३० वाजता सादर होणार आहे.
’स्थळ : पृथ्वी थिएटर्स, जुहू.
विजय तेंडुलकर स्मृतिदिनानिमित्त नाटयमहोत्सव
प्रसिद्ध नाटककार विजय तेंडुलकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रकाश पेंढारकर आयोजित कार्यक्रमात ‘स्टेजप्लेअर्स थिएटर्स’तर्फे रविवार १९ मे रोजी विजय तेंडुलकर लिखित दोन एकांकिका सादर करण्यात येणार आहेत. ‘मादी’ या एकांकिकेचे दिग्दर्शन अनिकेत साने यांनी केले असून विक्रम गायकवाड आणि श्रेया बुगडे ही एकांकिका सादर करतील. तर प्रितेश सोढा दिग्दर्शित ‘अजगर गंधर्व’ या एकांकिकेत अक्षता कुलकर्णी-गायकवाड आणि अजित कोकाटे हे कलाकार सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमासाठी नाटय़रसिकांना प्रवेश विनामुल्य आहे.
’स्थळ : महाराष्ट्र सेवा संघ, ऐरोली ’वेळ : संध्याकाळी ७
मुंबई ज्वालामुखीच्या उंबरठयावर
‘पोलिस डायरी’, ‘मुंबई माफिया’ अशा अनेक प्रसिद्ध पुस्तकांचे लेखक व ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर पवार यांच्या ‘मुंबई ज्वालामुखीच्या उंबरठयावर’ या पुस्तकाचे प्रकाशन १० मे रोजी आयोजित करण्यात आले आहे. याच वेळी त्यांनी लिहिलेल्या ‘मुंबईतील गुन्हेगारीचा एन्सायक्लोपीडिया’ या पुस्तकाच्या चौथ्या आवृत्तीचेही प्रकाशन होणार आहे. या कार्यक्रमात गृह राज्यमंत्री सतेज पाटील, खासदार व मुंबईचे पोलिस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंह, निवृत्त न्यायमूर्ती रवींद्र दवे उपस्थित राहणार आहेत.
’स्थळ : पोलिस क्लब, आझाद मैदान.
’वेळ : सायंकाळी ४.३०
‘स्वरबंध’ गीत गायन स्पर्धा
‘स्वरबंध’ ही संस्था गेल्या सात वर्षापासून ‘गीत गायन स्पर्धा’ व ‘सहवादक पुरस्कार’ या दोन कार्यक्रमांचे आयोजन करत आहे. या संस्थेने या वर्षी ‘हरिभाऊ विश्वनाथ कंपनी’ यांच्या सहकार्याने शास्त्रीय वाद्यसंगीताच्या स्पर्धेचे ११ व १२ मे रोजी आयोजन केले आहे. नवोदित कलाकारांना संधी देण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असून, हा कार्यक्रम सर्वासाठी खुला आहे.
’स्थळ : रवींद्र नाटय मंदिर (मिनी थिएटर) प्रभादेवी.
’वेळ : ११ व १२ मे, दु. २ ते रात्री ९
‘रेन’ या संगीतमय नाटय़ाचा प्रयोग
‘वर्ल्ड फेअर ट्रेड डे’चे औचित्य साधून ‘रंग’ थिएटर्स आणि ‘आय. आर. एफ. टी.’ या संस्थांतर्फे एकत्रितपणे ‘रेन’ या संगीतमय नाटय़ाचा प्रयोग सादर केला जाणार आहे. ‘रेन’ची संकल्पना आणि दिग्दर्शन बिजॉन मोंडल यांचे असून, फ्युजन संगीत प्रकारातील प्रयोगशील असलेल्या ‘ट्रान्सलुसेंट’ या बँडने या नाटय़ाला संगीत दिले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : ०९५९४६९५४८६.
’स्थळ : सेंट. अॅन्ड्रूज सभागृह, वांद्रे.
’वेळ : सायंकाळी साडे सात वाजता.
कवी संमेलन
कवींना आपल्या कला सादरीकरणासाठी व्यासपीठ मिळावे या हेतूने अक्षररंगच्या विद्यमानाने १२ मे रोजी कविसंमेलनाचे आयोजन केले आहे, या कार्यक्रमाचा आनंद सर्व रसिकांना उपभोगता येणार असून, स्वरचित मराठी कविता सादर करण्यासाठी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा. विद्याधर देशपांडे : ०२५१-२२०१६४३.
’स्थळ : ज्ञानेश्वर मंदिर सभागृह, पेट्रोल पंपासमोर, आग्रा रोड, कल्याण(प.)
’वेळ : सायंकाळी ६