महानगरपालिकेतील नोकरी घोटाळ्याप्रकरणी गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या अधिका-यांनी सोमवारी दोघांना अटक केली.
मुंबई- महानगरपालिकेतील नोकरी घोटाळ्याप्रकरणी गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या अधिका-यांनी सोमवारी दोघांना अटक केली. विशाल किशोर परमार आणि हिम्मत वासुरभाई बाफडा ऊर्फ हिम्मत मकवाना अशी या दोघांची नावे आहेत. त्यांनो न्यायालयाने २१ डिसेंबपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या दोघांच्या अटकेने या गुनत अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या आता नऊ झाली आहे.
महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागात नोकर भरती होती. या वेळी काही उमेदवारांनी स्थानिक दलाल आणि महानगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचा-यांशी संगनमत करून नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न केले होते. या वेळी स्वेच्छानिवृत्ती, मृत आणि सेवानिवृत्त झालेल्या कर्मचारी आणि कर्मचा-यांचे नातेवाईक असल्याचे बोगस कागदपत्रे तयार करण्यात आले होते. याच कागदपत्रांच्या आधारे दहा उमेदवारांना घनकचरा व्यवस्थापन विभागात नोकरी देण्यात आली होती.
मुळात या दहा उमेदवारांचे संबंधित मृत, स्वेच्छानिवृत्ती आणि सेवानिवृत्त कर्मचा-यांशी काहीही नाते नव्हते, मात्र कागदपत्रांवर ते त्यांचे नातेवाईक असल्याचे दाखवण्यात आले होते. या नोकरी भरतीमुळे लायक उमेदवारांना नोकरीपासून वंचित राहावे लागले होते. हा प्रकार उघडकीस येताच त्याची पोलीस आयुक्तांनी गंभीर दखल घेत संबंधित दलाल, महानगरपालिकेतील अधिकारी, कर्मचारी आणि इतर आरोपींविरुद्ध सरकारची फसवणूक केल्याप्रकरणी गांवदेवी पोलिसांना गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले होते.
या प्रकरणी फसवणुकीच्या गुनची नोंद होताच युनिट तीनच्या अधिका-यांनी १ डिसेंबरला कुणाल जोगडिया, सनी विजुंडा या दोन दलालांना, डी वॉर्डचे लिपिक दीपक चौकेकर आणि शिपाई अनिल बारिया या चौघांना अटक केली होती. त्यांच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीनंतर २ डिसेंबरला डी वॉर्डमध्ये अधिकारी पदावर काम करणा-या देवजी राठोड याला पोलिसांनी अटक केली.
या आरोपींच्या चौकशीत मनपाच्या अन्य काही अधिकारी आणि कर्मचा-यांची नावे समोर आली होती. त्यानंतर ८ डिसेंबरला याच गुनत अनिल बारिया आणि हर्षल पाटील या दोघांना अटक केली. या सर्व आरोपींनी हिम्मत बाफडा आणि विशाल परमार यांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी लावून बोगस कागदपत्रे सादर केली होती.
विशाल याने मयत अर्जुन नानाजी परमार यांचा मुलगा तर हिम्मतने सेवानिवृत्त महिला कर्मचारी लिला मकवाना यांचा मुलगा असल्याचे सांगून बोगस कागदपत्रे सादर केली होती. सध्या विशाल आणि हिम्मत हे दोघेही पोलीस कोठडीत असून त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. या प्रकरणात लवकरच अन्य काही आरोपींची अटक होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.