दुबईत कार्यरत असलेले ‘मसालाकिंग’ डॉ. धनंजय दातार यांना केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते ‘कोकण ग्लोबल पर्सनॅलिटी पुरस्कार’ देऊन नुकतेच गौरवण्यात आले.
मुंबई – दुबईत कार्यरत असलेले ‘मसालाकिंग’ डॉ. धनंजय दातार यांना केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते ‘कोकण ग्लोबल पर्सनॅलिटी पुरस्कार’ देऊन नुकतेच गौरवण्यात आले. नवी मुंबईतील सानपाडा परिसरातील सिडको मैदानावर आयोजित चौथ्या ग्लोबल कोकण महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात हा पुरस्कार देण्यात आला.
कोकणभूमी प्रतिष्ठान व नवी मुंबई बिल्डर असोसिएशनच्या वतीने आयोजित केलेल्या या महोत्सवात राज्याचे जलसंपदामंत्री सुनील तटकरे, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक, नगरविकास राज्यमंत्री उदय सामंत, खासदार डॉ. संजीव नाईक, नियोजन समितीचे कार्याध्यक्ष आमदार भाई जगताप, सिडकोचे अध्यक्ष प्रमोद हिंदूराव आदी मान्यवर उपस्थित होते.
शरद पवार साहेबांच्या हस्ते हा प्रतिष्ठित पुरस्कार मिळाल्याने मी भारावून गेलो आहे. असे पुरस्कार मला नेहमीच अधिक कार्यप्रवण, जनसेवातत्पर, आणि समाजाभिमुख बनण्याची प्रेरणा देतात. जगभर मंदीचे आव्हान असताना आमच्या ‘अल अदिल ट्रेडिंग’ समूहाने मात्र अजोड व्यवसाय क्षमता, सर्वागीण उत्कृष्टता आणि वेगवान प्रगती करून दाखवली त्याचीच पावती मिळाल्याचे दातार यांनी सांगितले.