लोकसभेतील काँग्रेसच्या नेतेपदी माजी रेल्वे मंत्री मल्लिकार्जून खर्गे यांची निवड करण्यात आली आहे.
नवी दिल्ली– लोकसभेतील काँग्रेसच्या नेतेपदी माजी रेल्वे मंत्री मल्लिकार्जून खर्गे यांची निवड करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकसभेत पक्षाचे नेतृत्व करावे अशी मागणी केली जात होती. मात्र सोमवारी खर्गे यांची नेतेपदी निवड करण्यात आल्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जनार्दन द्विवेदी यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला केवळ ४४ जागा मिळाल्या होत्या. लोकसभेत खर्गे या ४४ जणांचे नेतृत्व करतील. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनीच खर्गे यांच्या नावाची घोषणा केल्याचे द्विवेदी यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीनंतर राहुल गांधी यांनी विरोधी पक्ष नेते व्हावे अशी मागणी राष्ट्रीय युवक काँग्रेसकडून केली जात होती. राष्ट्रीय युवक काँग्रेसच्या बैठकीत अध्यक्ष राजीव सातव यांनी अशी मागणी केली होती.