दहशतवाद्यांविरोधी अतिदक्षतेचा इशारा राखून ठेवण्यासाठी मलेशियन पोलिसांनी इसिसशी संबंधित असल्याच्या संशयावरून १६२ संशयितांना अटक केली आहे, अशी माहिती गृहमंत्रालयाने गुरुवारी दिली
क्वालालंपूर – दहशतवाद्यांविरोधी अतिदक्षतेचा इशारा राखून ठेवण्यासाठी मलेशियन पोलिसांनी इसिसशी संबंधित असल्याच्या संशयावरून १६२ संशयितांना अटक केली आहे, अशी माहिती गृहमंत्रालयाने गुरुवारी दिली.
मलेशियात येणा-या पर्यटकांना मायदेशी परत पाठवताना त्यांची संपूर्ण चौकशी करूनच मायदेशी पाठवले जाईल. यासाठी अत्याधुनिक पर्यटक तपास यंत्रणा सरकारकडून लागू करण्यात येणार आहेत, अशी माहिती गृहमंत्रालयाने लेखी स्वरूपात संसदेला दिली.
द रॉयल मलेशियन पोलिसांनी इसिस या दहशतवादी गटांशी संबंध असल्याच्या संशयावरून १६२ जणांना अटक केली, अशी माहिती मंत्रालयाने दिली. दरम्यान वाहतूक मंत्री लियो टिआँग यांनी दहशतवादी विरोधी अतिदक्षतेच्या इशा-याबाबत बोलताना सांगितले की, जनतेला दहशतवाद्यांच्या दबावाखाली येऊन दुखी होण्याची गरज नाही.
मलेशियात सर्व ठिकाणावर नजर ठेवण्यासाठी विशेष प्रणाली आहे. ही प्रणाली केवळ विमानतळापुरतीच मर्यादित नसून वाहनतळ आणि रेल्वेस्थानकातही तैनात करण्यात आली आहे. दहशतवादी हल्ल्यांबाबत आम्ही गंभीर आहोत आणि सुरक्षिततेबाबतीत आम्ही सुधारणा केली आहे, अशी माहिती त्यांनी पत्रकारांना दिली. लियो यांच्यामते आंतरराष्ट्रीय विमानतळावर अतिरिक्त स्कॅनर्स आणि सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. क्वाला लंपूर या आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे. सध्या मलेशिया सुरक्षित आणि धोकारहित आहे. मलेशियाचे इतर देशांशी चांगले संबंध आहेत. जे देश मलेशियाला गुप्तचर विभागाची माहिती पुरवतात. त्या देशांशी मलेशियाचे घनिष्ट संबंध आहे, असे ते म्हणाले.