मुंबई महापालिकेच्या कारभारावर प्रत्येक मुंबईकरांच्या मनात एक असंतोष खदखद असतो. मग तो रस्त्यावरील खडय़ांमुळे असेल किंवा जागोजागी साचलेल्या घाणीमुळे असेल. अपु-या पाणी पुरवठय़ामुळे असेल नाही तर महापालिका रुग्णालयातील भोंगळ कारभारामुळे असेल. मुंबईकर नाराज असतो. परंतु आपल्या मनातील संताप तो गिळून गपगुमान जगत असतो. या संतापाला आरजे मलिष्काने ‘मुंबई तुला बीएमसीवर भरोसा नाय काय’ या व्हीडिओच्या माध्यमातून व्यक्त केला. प्रत्येकाला ही आपल्याच मनातील सल आहे, असे वाटल्याने त्यांनी तो व्हीडिओ अक्षर: डोक्यावर घेतला. मुंबईकरांच्या मनातील सल अचूकपणे मांडल्यामुळे मुंबईकर मलिष्कावर खूश असले तरी महापालिका मात्र तिच्यावर खट्ट झाली आहे. विशेषत: सत्ताधारी शिवसेनेला चांगल्याच मिरच्या झोंबल्या आहेत. मलिष्कावर पाचशे कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. मुंबई महापालिकेनेही आता मलिष्काला अडचणीत आणण्याचे प्रयत्न चालविले आहेत. या गाण्यानंतर लगेच मुंबई महापालिकेचे कर्मचारी आणि अधिकारी तिच्या घरी धावले. घराची तपासणी करून तिच्या घरात डेंग्यूच्या अळय़ा असल्याचे जाहीर करून टाकले. तसेच तिच्या घराची बारकाईने तपासणी करून कुठे अनधिकृत बांधकाम दिसते का, याचा शोधही महापालिकेने घेतल्याचे बोलले जाते. महापालिका आणि शिवसेना जरी आता मलिष्काराच्या विरोधात उभे ठाकलेले असले तरी संपूर्ण मुंबईकर, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पक्ष तिच्या पाठीशी उभे आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तर मलिष्काला तिच्याच स्टाईलने पाठिंबा दिला आहे. महापालिकेच्या कारवाईवर मनसेचे संदीप देशपांडे यांनी मिष्कील भाष्य केले आहे. ‘‘मलिष्काच्या घरात अळ्या सापडल्या ‘गोलगोल’, मलिष्काने शिवसेनेची केली ‘पोलखोल’ अशी टिप्पणी त्यांनी केली आहे. आमदार नितेश राणे यांनीही मलिष्काप्रकरणी ट्विटरच्या माध्यमातून सेनेची खिल्ली उडवली आहे. ‘मलिष्का तू एकटी नाही. आम्ही आहोत तुझ्या बरोबर.. वाघोबा करतो म्याव म्याव.. आम्ही आणि मलिष्का बहीण भाव.’ संपूर्ण मीडियाही तिच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला आहे. मुंबईकरांच्या मनातील वेदनेला वाचा फोडणारी मलिष्का खरे तर रेडिओ जॉकी आहे. रेड एफएमवरील तिचा कार्यक्रम अत्यंत लोकप्रिय आहे. शिवसेना आणि महापालिकेने तिला टार्गेट केले असले तरी मुंबईकर म्हणत आहेत, ‘‘मलिष्का आमचा तुझ्यावर भरोसा हाय.’
मलिष्का तुझ्यावर भरोसा हाय!
RELATED ARTICLES
Recent Comments
किल्ले जीवधन
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
अभिजात भाषा
on
आळशी मांजर
on
आमचा टॉम
on
छोटीशी सोनू
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
मनातली कविता
on
संपर्क
on
हेल्पलाइन
on
दगडफूल
on
हेल्पलाइन
on
संपर्क
on
संपर्क
on
भयाचे भूत..
on
मोदी करिष्मा
on
E-Book
on
गुणकारी शेपू
on
निष्ठावंत
on
संपर्क
on
संपर्क
on
५१ मध्ये ७
on
गर्दीच गर्दी
on
मूक मोर्चा
on
RSS NEWS
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
महात्मा…
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
रामघळ
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
वाढदिवस
on
वृक्षारोपण
on
रमाचा दुखणा
on
तगडे उमेदवार
on
आमची दिवाळी…
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
अनुभव
on
गीर गाय
on
सगुणेचा संप
on
तपास पथक
on
संपर्क
on
भुजंगासन
on
एकटेपणाची सल
on
संपर्क
on
ईश्वर
on
आयपीएल
on
“न्याय द्या”
on
“अभिवादन”
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
संपर्क
on
E-Book
on
हॉटेलचं हृदय
on
फसवणूक
on
भीषण आग..
on
आज टिप ऽऽर!
on
संपर्क
on
संपर्क
on
अमिषा पटेल..
on
संपर्क
on
माझी आई
on
मनातलं
on
वेलकम बॅक
on
संपर्क
on
शटर लाईफ
on
“कुराण वाचन”
on
चढणीचे मासे
on
संपर्क
on
वैशाख वणवा
on
आजोळचे दिवस
on
संपर्क
on
संपर्क
on
कचरा नकोच!
on
मनातलं
on
मनातलं
on
संपर्क
on
संपर्क
on
जैतापूरच..!
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
तो अन् मी
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
संपर्क
on
संपर्क
on
नूरा कुस्ती
on
“सन्नाटा”
on
खाकीला डाग!
on
सजीव गाथा
on
संपर्क
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
सिगारेट
on
संपर्क
on
सोशल पोलिस
on
गु-हाळ
on
जिंकणारच!
on
आम आदमी सेना
on
ग्रँड चव
on
पाणी
on
पाणी
on
जिंकणारच!
on
जिंकणारच!
on
चमकेशगिरी
on
म्हाळवस
on
सुमंगल यश
on
अर्नोल्ड
on
दहीहंडी
on
भूकंपानंतर…
on
वाघ तो वाघच
on
आदिती राव
on
मुंबई चिंब!
on
वाहतूकवेडा
on
स‘माज’
on
मैं हूँ ना!
on
मेट्रो आली
on
“हीच ती कार”
on
सत्तातूर !
on
विजय सलामी
on
मतदान करा..
on
नाजूक त्वचा
on
जागे व्हा
on
नाच रे मोरा…
on
काठयांचा खेळ
on
“विसर्जन”
on
रेल्वे ठप्प
on
रेल्वे ठप्प
on
भन्नाट
on
“सिंग साहब
on
ऊस पेटला
on
चतुरस्र श्री
on
पेन स्टॅण्ड
on
आनंदाची चाळ
on
चंड‘प्रतापी’
on
महाकुंभ
on
सैतानाचा बाप
on
सुखोई सफर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
बलिष्ठ गवा
on
मराठी बिराठी
on