मर्सिडिझ बेन्झ या भारतातील सर्वात मोठ्या लक्झरी कार उत्पादकाने आपल्या सी-क्लास पोर्टफोलियोमध्ये ‘एडिशन सी’ची भर घातली. एडिशन सीमध्ये नवीन बाह्यरचना आणि अंतर्रचना आहे आणि त्यामुळे सध्याची’सी-क्लास’ अधिक आकर्षक झाली आहे.
पुणे- मर्सिडिझ बेन्झ या भारतातील सर्वात मोठ्या लक्झरी कार उत्पादकाने आपल्या सी-क्लास पोर्टफोलियोमध्ये ‘एडिशन सी’ची भर घातली. एडिशन सीमध्ये नवीन बाह्यरचना आणि अंतर्रचना आहे आणि त्यामुळे सध्याची’सी-क्लास’ अधिक आकर्षक झाली आहे. ‘एडिशन सी’च्या निमित्ताने मर्सिडिझ बेन्झने ‘सी क्लास’ प्रकारात अजून एक रंग सादर केला आहे – द डिझायनो हयासिन्थ रेड.
मर्सिडिझ बेन्झ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रोलँड फॉल्गर यांनी सी-क्लास एडिशन सी सादर केली आहे. मर्सिडिझ बेन्झ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रोलँड फॉल्गर म्हणाले, “आजच्या सतत बदलणा-या बाजारपेठेत परिणामकारक लाईफ सायकल व्यवस्थापनासाठी आपल्या उत्पादनांमध्ये सतत सुधारणा करणे आवश्यक असते आणि हाच आमच्या उत्पादन धोरणांचा गाभा आहे. आमच्या ग्राहकांना सातत्याने नावीन्यपूर्णतेचा अनुभव देण्याचा आणि त्यांना नवनवीन उत्पादने उपलब्ध करून देण्याचा मर्सिडीझ बेन्झमध्ये आमचा नेहमी प्रयत्न असतो.
[EPSB]
आदिवासी एकवटले मुरबाड तहसील कार्यालयावर मोर्चा
वनहक्क प्लॉट, रेशनिंग, घरकुले, जातीचा दाखला, वीज आणि इतर मूलभूत समस्यांसाठी नुकताच श्रमजीवी संघटना महाराष्ट्र यांच्या वतीने मुरबाडमधील आदिवासीबांधवांनी भव्य मोर्चा काढण्यात आला.
[/EPSB]