ब्रिक्स देशांच्या परिषदेवर असलेले पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी गुरुवारी चीनचे पंतप्रधान शी जिपींग यांची भेट घेतली.
डरबन – ब्रिक्स देशांच्या परिषदेवर असलेले पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी गुरुवारी चीनचे पंतप्रधान शी जिपींग यांची भेट घेतली. या उच्चस्तरीय भेटीमध्ये भारत आणि चीन देशांच्या सीमेवर ब्रम्हपुत्रा नदीवर बांधण्यात आलेल्या धरणासंदर्भात चर्चा झाली. चीनच्या पंतप्रधान पदी विराजमान झाल्यानंतर शी जिपींग यांची भारतासोबत पहिलीच बैठक झाली.
भारत आणि चीन या दोन्ही देशांतून वाहणा-या ब्रम्हपुत्रा नदीवर भारताचा विरोध डावलून तीन भलेमोठे धरण बांधण्यास चीनच्या सरकारने मंजूरी याआधीच दिली आहे. याच मुद्दयावर पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी शी जिपिंग यांच्याकडे चिंता व्यक्त केली.
या जलविद्युत प्रकल्पांमुळे ब्रम्हपुत्रा नदीचे पाणी भारताच्या हद्दीत शिरुन भारताच्या ईशान्येडील राज्यांना मोठ्या प्रमाणात धोका निर्माण होऊ शकतो, अशी भूमिका भारताने मांडली आहे. तर दुसरीकडे कोणतीही नवी योजना राबवताना नदीपात्राच्या शेजारील देशांचे हित पाहूनच योजना अमलात आणली जाते अशी भूमिका चीनचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते हांग लेई यांनी घेतली होती.
दोन्ही देशांच्या पंतप्रधानांमध्ये अंदाजे २५ मिनिटे झालेली चर्चा सकारात्मक झाल्याचे सुत्रांनी सांगितले. दोन्ही देशांमधील संबंधांवरही पंतप्रधानांमध्ये चर्चा झाली.