नांदेडहून मनमाडच्या दिशेने जाणा-या पॅसेंजरला औरंगाबाद – दौलताबाद रेल्वेस्थानकादरम्यान रविवारी पहाटे भीषण आग लागली.
औरंगाबाद – नांदेडहून मनमाडच्या दिशेने जाणा-या पॅसेंजरला औरंगाबाद – दौलताबाद रेल्वेस्थानकादरम्यान रविवारी पहाटे भीषण आग लागली. या आगीत पॅसेंजरचा एक डबा संपूर्ण जळून खाक झाला.
रविवारी पहाटे १.४५ मिनिटाच्या सुमारास ही आग लागली. नांदे़डहून मनमाडच्या दिशेने जाणारी ही पॅसेंजर औरंगाबाद स्थानकातून रवाना झाल्यानंतर पुढील पाच मिनिटातच गाडीच्या दोन डब्यात आग लागल्याचे प्रवाशांच्या निदर्शनास आले. त्यानंतर तात्काळ रेल्वे थांबवण्यात आली. प्रवाशांनी वेळीच प्रसंगावधान राखल्याने मोठी दुर्घटना टळली. अग्निशमन दलाच्या जवांनानीही तात्काळ घटनास्थळी दाखल होत काही वेळातच आग विझवली.
या दुर्घटनेत दोन प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे. दरम्यान, पॅसेंजरला आग कशी काय लागली याबाबतचे कारण स्पष्ट झाले असून पोलिसांचा तपास सुरु आहे.