भारताच्या मनप्रीत सिंगने जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत उपउपांत्यपूर्व फेरी गाठली. ९१ किलो गटातील दुस-या फेरीत शुक्रवारी त्याने सिशेल्सच्या केडी अॅग्नेसचा
३-० असा पराभव केला.
![BOXING](http://prahaar.in/wp-content/uploads/2013/03/BOXING.jpg)
अल्माटी – भारताच्या मनप्रीत सिंगने जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत उपउपांत्यपूर्व फेरी गाठली. ९१ किलो गटातील दुस-या फेरीत शुक्रवारी त्याने सिशेल्सच्या केडी अॅग्नेसचा ३-० असा पराभव केला.
पहिल्या फेरीत ‘बाय’ मिळालेला मनप्रीतने केडीला फारशी संधीच दिली नाही. मनप्रीतने अप्परकट्स आणि सरळ पंच मारत बाजी मारली. तिस-या फेरीत मनप्रीतसमोर सोमवारी (२१ ऑक्टोबर) अव्वल मानांकित अझरबैजानच्या तैमूर मामद्यॉवचे आव्हान आहे.
विजेंदरची आज लढत
७५ किलो गटाच्या दुस-या फेरीत शनिवारी (१९ ऑक्टोबर) भारताचा अव्वल बॉक्सर विजेंदर सिंगची गाठयुरोपियन विजेता आर्यलडच्या जेसन क्विग्लेशी पडेल.