अधिकाधिक नवमतदारांनी मतदान केंद्रावर यावे यासाठी जालंधर जिल्हा निवडणूक कार्यालयाने प्रथमच मतदान करणा-या मतदारांना मोबाईल खरेदी आणि अन्य वस्तूंवर सवलत जाहीर केली आहे.
जालंधर – अधिकाधिक नवमतदारांनी मतदान केंद्रावर यावे यासाठी जालंधर जिल्हा निवडणूक कार्यालयाने प्रथमच मतदान करणा-या मतदारांना मोबाईल खरेदी आणि अन्य वस्तूंवर सवलत जाहीर केली आहे.
काही निवडक इलेक्ट्रॉनिक दुकानांमध्ये प्रथमच मतदान करणा-या मतदात्यांना मोबाईल खरेदीवर दहा ते पंधरा टक्के सवलत मिळेल. फक्त त्यांना दुकानदारांना बोटावरची मतदान शाई दाखवावी लागेल असे जालंधरचे जिल्हा निवडणूक अधिकारी वरुण रुजाम यांनी सांगितले.
याचप्रमाणे जालंधरमधील काही उपहरागृहांनीही मतदान करुन येणा-या नवमतदात्यांना तीस टक्के सवलत जाहीर केली आहे. पंजाबमधील लोकसभेच्या तेरा जागांसाठी ३० एप्रिलला मतदान होणार आहे.