दिवाळीनिमित्त प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे गुरुवार, १५ नोव्हेंबर रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) ते मडगाव आणि मडगाव ते एलटीटीदरम्यान विशेष गाडय़ा सोडणार आहे
मुंबई – दिवाळीनिमित्त प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे गुरुवार, १५ नोव्हेंबर रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) ते मडगाव आणि मडगाव ते एलटीटीदरम्यान विशेष गाडया सोडणार आहे. या गाडयांचे आरक्षण १३ नोव्हेंबर रोजी सर्व आरक्षण केंद्रांवर सुरू होईल. १५ नोव्हेंबर रोजी रात्री ११.५५ वाजता एलटीटीहून सुटणारी ही विशेष गाडी मडगावला दुस-या दिवशी दुपारी २.२५ पोहोचेल.
तर मडगाव-एलटीटी ही विशेष गाडी गुरुवारी दुपारी ३ वाजता निघून दुस-या दिवशी सकाळी ३ वाजता एलटीटीला पोहोचेल. या गाडय़ांना प्रथम श्रेणीचा एक, एसी द्वितीय वर्गाचे तीन, एसी तृतीय वर्गाचे नऊ डबे शिवाय दोन जनरेटर/गार्ड व पँट्री डबा जोडण्यात येणार आहे.