समझौता एक्स्प्रेसमध्ये बॉम्ब ठेवणा-या राजेंद्र चौधरीचा २००७ मध्ये झालेल्या मक्का मशिदीतील बॉम्बस्फोटात सहभाग असल्याचा संशय राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेने (एनआयए) व्यक्त केला आहे.
नवी दिल्ली- समझौता एक्स्प्रेसमध्ये बॉम्ब ठेवणा-या राजेंद्र चौधरीचा २००७ मध्ये झालेल्या मक्का मशिदीतील बॉम्बस्फोटात सहभाग असल्याचा संशय राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेने (एनआयए) व्यक्त केला आहे. या अंतर्गत मशिदीतील बॉम्बस्फोटाचा छडा लावण्यासाठी चौधरीचा उपयोग होऊ शकतो, असे एमआयएच्या अधिका-यांचे म्हणणे आहे. १८ मे २००७ रोजी हैदराबाद येथील मक्का मशिदीत झालेल्या बॉम्बस्फोटात त्याचा सहभाग असल्याचा अंदाज आहे.
उजैनपासून ५० किमी अंतरावर असणा-या नाग्डा येथून शनिवारी चौधरीला एनआयएच्या अधिका-यांनी अटक केली. तो आपले नाव व ओळख बदलून मागील तीन वर्षापासून येथे राहत होता.