विरोधकांच्या प्रचंड गोंधळातच सरकारने गुरुवारी ऐतिहासिक भूसंपादन विधेयक लोकसभेत सादर केले.
नवी दिल्ली- रुपयाच्या अवमुलनावर पंतप्रधानांनी भाष्य करावे यासाठी विरोधकांनी घातलेल्या प्रचंड गोंधळातच सरकारने ऐतिहासिक भूसंपादन विधेयक लोकसभेत सादर केले. केंद्रीय ग्राम विकासमंत्री जयराम रमेश यांनी हे विधेयक सादर केले.
मात्र, विरोधकांनी रुपयाच्या घसरणीवर पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी निवेदन द्यावे, या मागणीवर ठाम राहिल्याने संसदेचे कामकाज दुपारी साडेबारा वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.