वादग्रस्त भू-संपादन अध्यादेशावरुन विरोधकांनी लोकसभेत गदारोळ घातला.
नवी दिल्ली – वादग्रस्त भू-संपादन अध्यादेशावरुन विरोधकांनी लोकसभेत गदारोळ घातला. काँग्रेस, डाव्यांसह तृणमूल, सपा, आरजेडी या विरोधी पक्षांच्या नेत्यांनी लोकसभेत विधेयकाविरोधात जोरदार घोषणाबाजीही केली.
यावेळी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी, सपाचे मुलायम सिंग यादव हे नेतेही यावेळी उपस्थित होते.
या अध्यादेशाला काँग्रेसचे ज्योतिरादित्य सिंदिया, के.सी.वेणूगोपाल आणि गौराव गोगोई, आरजेडीचे राजेश रंजन उर्फ पप्पू यादव, जदयूचे धर्मेंद्र यादव यांनीही यावेळी जोरदार विरोध दर्शविला.
विरोधकांचा गदारोळ सुरुच राहिल्याने लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांनी दोन वाजेपर्यंत लोकसभेचे कामकाज तहकूब केले.