भिवंडी येथील सावित्रीबाई विकलांग विद्यालयात शिकणा-या बुलबुल जैन (२२) या गतिमंद मुलीने ऑस्ट्रेलियातील केस्टल येथे झालेल्या एशिया पॅसिफिक स्पर्धात गोळाफेक या खेळात रौप्य, तर १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत कांस्यपदक पटकावले आहे.
भिवंडी – येथील सावित्रीबाई विकलांग विद्यालयात शिकणा-या बुलबुल जैन (२२) या गतिमंद मुलीने ऑस्ट्रेलियातील केस्टल येथे झालेल्या एशिया पॅसिफिक स्पर्धात गोळाफेक या खेळात रौप्य, तर १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत कांस्यपदक पटकावले आहे.
ऑस्ट्रेलियात दर चार वर्षानी गतिमंद मुलांसाठी विशेष ऑलिम्पिक स्पर्धाचे आयोजन करण्यात येते. या स्पर्धेत १३ राष्ट्रांच्या गतिमंद मुलांनी भाग घेतला होता. तर भारतातील ४२५ विद्यार्थ्यांनी भाग घेऊन आपल्या खेळाची चुणूक दाखवली. या स्पध्रेत बुलबुल जैन हिने विशेष कामगिरी करत सिल्वर आणि कांस्यपदक मिळवले आहे. बुलबुलने मिळवलेल्या या यशामुळे तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
शहरातील चरणीपाडा येथे डॉ आचार्य मागील २५ वर्षापासून गतिमंद मुलांसाठी सावित्रीबाई विकलांग विद्यालय ही विनाअनुदानित शाळा चालवतात. या शाळेत १३५ विद्यार्थी शिकत आहेत. या शाळेचे मुख्याध्यापक ननू चौधरी हे निवृत्त आयपीएस अधिकारी असून, त्यांनी या गतिमंद विद्यार्थ्यांकरता आहोरात्र परिश्रम घेऊन क्रीडा क्षेत्रात प्रावीण्य प्राप्त केले आहे.