डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त जवाहरलाल नेहरु विद्यापीठ (जेएनयू) विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैय्या कुमार नागपुरात आलेला असतांना त्याच्यावर चप्पल फेकण्यात आली.
नागपूर- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त जवाहरलाल नेहरु विद्यापीठ (जेएनयू) विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैय्या कुमार नागपुरात आलेला असतांना त्याच्यावर चप्पल फेकण्यात आली. चप्पल कोणी फेकली हे अद्यापही समजलेले नाही. मात्र बजरंग दलाचा कार्यकर्ता असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १२५ जयंती साजरी करत आहेत. याच निमित्ताने कन्हैया गुरूवारी नागपूरमध्ये दीक्षाभूमीवर आला. त्यानंतर विद्यार्थी संघटनांच्या कार्यक्रमात तो सहभागी झाला.
मात्र, कन्हैयाला बजरंग दलाचा विरोध होता. कन्हैयाने भाषण सुरू करण्याआधी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू करत अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी घोषणा देणा-या कार्यकर्त्यांना सभागृहातून बाहेर काढले.
पुन्हा एकदा कन्हैयाने आपल्या भाषणाला सुरूवात केली. पाच मिनिटे भाषण झाले. यामध्ये त्याने भाजपा आणि संघावर सडकून टीका केली. त्याचवेळी समोर असलेल्या जमावातून कन्हैयाच्या दिशेने चप्पल फेकली.
चप्पल फेकणा-या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे. घडलेल्या सर्व प्रकारामुळे सभागृहात गोंधळाचे वातावरण होते.
[EPSB]
नागपूर ही संघाची भूमी नाही-कन्हैया कुमार
नागपूर ही संघाची भूमी नसून, दिक्षाभूमी असल्याचे वक्तव्य जवाहरलाला नेहरू विद्यापीठतील विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैय्या कुमार याने केले आहे. [/EPSB]