क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (सीए) सोमवारी भारताविरुद्ध या वर्षाच्या अखेरीस मायदेशात होणा-या मालिकेचे वेळापत्रक जाहीर केले.
मेलबर्न : क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (सीए) सोमवारी भारताविरुद्ध या वर्षाच्या अखेरीस मायदेशात होणा-या मालिकेचे वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार २४ नोव्हेंबरपासून दोन दिवसीय दोन सराव लढतींनी भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा सुरू होईल.
पाठोपाठ पहिली कसोटी ४ ते ८ डिसेंबर दरम्यान ब्रिस्बेन येथे खेळण्यात येईल. दुसरी कसोटी १२ ते १६ डिसेंबर दरम्यान अॅडलेड, तिसरी कसोटी २६ ते ३० डिसेंबर दरम्यान मेलबर्न आणि चौथी कसोटी ३ जानेवारीपासून सिडनी येथे होईल.
पाठोपाठ भारताला ऑस्ट्रेलियासह इंग्लंडचा समावेश असलेली तिरंगी मालिका १६ जानेवारीपासून खेळायची आहे. ऑस्ट्रेलिया भारताविरुद्धची कसोटी मालिका खेळण्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ५ नोव्हेंबरपासून तीन टी-२० आणि पाच वनडेंची मालिकाही खेळेल.