भारत – पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवरून सोमवारी सुरक्षा दलाच्या जवानांनी २४४ किलोग्रॅमचे हेरॉईन, नकली नोटा, शस्त्रात्रे हस्तगत केले.
जालंधर – भारत – पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवरून सोमवारी सुरक्षा दलाच्या जवानांनी २४४ किलोग्रॅमचे हेरॉईन, नकली नोटा, शस्त्रात्रे हस्तगत करण्यात आले.
सुरक्षा दलाच्या जवानांनी सीमेवरुन २४३. ६ किलोग्रॅमचे हेरॉईन, चार लाख रुपयांच्या नकली नोटा, १२ शस्त्रात्रे आणि काही अमली पदार्थ हस्तगत केल्याची माहिती पंजाबचे पोलिस महासंचालक अजय कुमार तोमर यांनी दिली.
२०१३ मध्ये ३२२ किलोचे अमली पदार्थ हस्तगत करण्यात आले होते. मात्र यावर्षी अमली पदार्थांच्या तस्करीमध्ये वाढ झाली असून यावर्षी पहिल्या चार महिन्यांतच २४४ किलोचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.