अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा तीन दिवसांचा भारत दौरा आटोपून मंगळवारी दुपारी सौदी अरेबियाला रवाना झाले.
नवी दिल्ली – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा तीन दिवसांचा भारत दौरा आटोपून मंगळवारी दुपारी सौदी अरेबियाला रवाना झाले. दिल्लीच्या पालम विमानतळावरुन दुपारी १.५५ च्या सुमारास ओबामांच्या विशेष एअरफोर्स वन विमानाने सौदी अरेबियासाठी उड्डाण केले.
ओबामांना निरोप देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी विमानतळावर येतील अशी शक्यता होती. मात्र मोदींच्या जागी ऊर्जा मंत्री पियुष गोएल आणि परराष्ट्र सचिव सुजाता सिंह निरोप देण्यासाठी विमानतळावर उपस्थित होते.
ओबामा आपल्या तीन दिवसाच्या भारत दौ-यात आग्र्याला जाऊन ताज महालही पाहाणार होते. मात्र सौदी अरेबियाच्या नव्या राजांच्या भेटीचा कार्यक्रम ठरल्याने त्यांनी ताज महालचा नियोजित कार्यक्रम रद्द केला.
ओबामांनी याबद्दल खंतही व्यक्त केली. या संस्मरणीय दौ-याबद्दल ओबामांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशावासियांचे आभार मानले. ओबामांच्या या दौ-यात मागच्या काहीवर्षांपासून रखडलेला अणूऊर्जा करार पूर्णत्वास गेला तसेच अन्य महत्वाचे करारही झाले.